गौतमी पाटील अन् अलका कुबल स्क्रिनवर एकत्र दिसणार; Video शेअर करत गौतमीने दिली हिंट

गौतमी पाटील आता फक्त कार्यक्रमच नाही तर मराठी चित्रपटांमध्येही झळकत असते. आता पु्हा एकदा ती नवीन मराठी चित्रपटात झळकणार असल्याची चाहूल लागली आहे. कारण मराठी कलाकार मंडळींसोबतचा तिचा भेटीचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

गौतमी पाटील अन् अलका कुबल स्क्रिनवर एकत्र दिसणार;  Video शेअर करत गौतमीने दिली हिंट
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 3:58 PM

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या तिच्या कार्यक्रमांप्रमाणेच चित्रपटांच्या शुटींगमध्येही व्यस्त झाल्याचं दिसून येत आहे. लाईक शेअर सबस्क्राईबमध्ये लिंबू मारला गाण्यात अमेय वाघसोबत गौतमी थिरकताना दिसली होती. या आयटम साँगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता गौतमीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती आणखी एका चित्रपटात दिसण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

गौतमी पाटील नवीन चित्रपटात झळकणार? 

गौतमी पाटीलने एक व्हिडीओ शेअक केला आहे ज्यात अनेक मराठी कलाकार मंडळी दिसत आहेत. ज्यामध्ये आपल्या अभिनयाने महाराष्ट्राच्या प्रक्षकांना आपला चाहता बनवणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल, त्यानंतर बोल्ड ॲन्ड ब्युटिफुल सई ताम्हणकर, बिगबॉस फेम शिव ठाकरे, अभिनेते संजय खापरे, यांच्यासोबत अनेक कलाकार या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यामुळे अलका कुबल, सई ताम्हणकर आणि गौतमी पाटील यांचा किलर कॉम्बो एकत्र झळकणार असल्याची सध्या चर्चा आहे.

व्हिडिओत गौतमी या कलाकारांना भेटत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसतेय. सोशल मिडियावर तिनं या भेटीचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामुळे आता गौतमी सई आणि अलका कुबल यांच्यासोबत काही नवा प्रोजेक्ट करतेय का? अशा चर्चा रंगल्या आहेत. गौतमीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कलाकारांसोबत काहीतरी चर्चा करताना दिसतेय. त्यानंतर त्यांच्या संभाषणात सई ताम्हणकरही आल्याचं दिसलं.हा व्हिडिओ मॉलच्या आवारातला किंवा एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय.

कलाकारांसोबतच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडिओ शेअर करत गौतमीने “सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं” असं कॅप्शन देत तिने व्हिडिओ पोस्ट केलाय. तिच्या या व्हिडीओमुळे अनेक गोष्टींचे तर्क लावले जात आहेत. पण ही भेट योगायोगानं झाली होती की गौतमीटचा या कलाकारांसोबत कोणता नवीन प्रोजेक्ट येतोय का याचा खुलासा अजून तिनं केला नाहीय. त्यामुळं गौतमी नक्की काय करतेय याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

तसं पाहायला गेलं तर गौतमीने मराठी चित्रपटाती लावणीमध्ये आपल्या नृत्याने चाहत्यांचे प्रेम आणि कौतुक मिळवलं होतं. त्यामुळे आता गौतमीच्या या व्हिडीओमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.