कमरेला झेंडा गुंडाळण्यापासून ते ‘गंदी बात’पर्यंतचा प्रवास; कोण आहे गहना वशिष्ठ?

अभिनेत्री गहना वशिष्ठ पोर्नोग्राफी प्रकरणात सापडली आहे. याप्रकरणी ईडीने तिची सात तास चौकशी केली असून, तिने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तिचा 'मिस आशिया बिकिनी' पुरस्कार, कमरेभोवती झेंडा लपेटलेल्या फोटोशूटचा वाद आणि 'गंदी बात'सारख्या वेबसीरिजमधील भूमिका यांचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे या लेखात पाहूया.

कमरेला झेंडा गुंडाळण्यापासून ते 'गंदी बात'पर्यंतचा प्रवास; कोण आहे गहना वशिष्ठ?
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 8:14 PM

पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव आले आहे. या प्रकरणी तिची ईडीने सात तास चौकशी केली आहे. या चौकशीत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्राच्या घर आणि कार्यालयावर ईडीने याच प्रकरणात छापेमारी केली आहे. त्यामुळे गहनाही चर्चेत आली आहे. त्यामुळे गहनाचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोण आहे गहना वशिष्ठ? ती अचानक चर्चेत का आली?

शॉकिंग खुलासे

पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री, निर्माती गहना वशिष्ठचे नाव समोर आले आहे. गहनाची ईडीने या प्रकरणात कसून चौकशी केली. यावेळी तिने पोर्नोग्राफी प्रकरणी प्रत्येक चित्रपटासाठी तीन लाख रुपये मिळत होते आणि ती राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये देखील गेली होती, असा दावा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

वाद आणि गहना

गहना वशिष्ठ आणि वाद नवीन नाही. गहनाला एकदा एडल्ट व्हिडीओ शूट करून अपलोड करण्याच्या आरोपात अटक झाली होती. ती नेहमीच चर्चेत असते आणि अनेकदा तिला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत.

‘मिस आशिया बिकिनी’ पुरस्कार

गहनाचे खरे नाव वंदना तिवारी आहे. ती छत्तीसगडच्या चिमरी गावाची आहे. लहानपणापासून तिला अभिनय आणि मॉडेलिंगचे प्रचंड आकर्षण होते. तिने 2012 मध्ये ‘मिस आशिया बिकिनी’ पुरस्कार जिंकला होता. गहना हिंदी आणि तेलुगू चित्रपटांसोबतच अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे.

फोटोशूट आणि वाद

गहनाने 2020 मध्ये एक फोटोशूट केले होते. त्यात तिने कमरच्या खाली तिरंगा लपेटला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मोठा वाद निर्माण झाला होता. गहना केवळ पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप यावेळी झाला. या फोटोशूटमुळे मुंबईत तिच्यावर हल्ला झाला होता.

आजाराशी झुंज

2019 मध्ये गहना वशिष्ठ शूटिंगच्या दरम्यान गंभीरपणे आजारी पडली होती. अनेक तास काही न खातापिता काम केल्याने सेटवरच ती भोवळ आली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

करिअर काय?

गहना वशिष्ठ ऑल्ट बालाजीच्या ‘गंदी बात’ वेब सीरिजमध्ये दिसली होती. तसेच तिने स्टार प्लसच्या ‘बहनें’ या प्रसिद्ध मालिकेतही भूमिका केली होती. गहना साउथच्या चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे आणि 2015 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये योगराज सिंग आणि अतुल वासन सोबत एक शो होस्ट केला होता.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.