हा करोना बॅचचा डॉक्टर आहे का?; मालिकेत जानकीच्या ब्लाऊजवर मलमपट्टी केल्याने नेटकरी संतापले
'घरोघरी मातीच्य चुली' या मालिकेतील एक चूक नेटकऱ्यांनी पकडली आहे. ती पाहून सोशल मीडियावर अनेक मेजशीर कमेंट्स पास होताना दिसत आहेत.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका टीआरपी यादीमध्ये देखील पहिल्या स्थानावर असते. पण सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील एक सीन पाहून टीका होत आहे.
गेल्या आठवड्यात ‘घरोघरी मातीच्या चुली’आणि ‘ठरलं तर मग’या मालिकांचा महासंगम एपिसोड दाखवण्यात आला होता. त्यामध्ये दाखवण्यात आले की मधुभाऊंच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे सायली तिच्या मधुभाऊंना काही दिवस जानकीकडे राहायला पाठवते. मात्र, ऐश्वर्यामुळे ही माहिती महिपतपर्यंत पोहोचते. महिपत मधुभाऊंवर हल्ला करण्याची तयारी करतो. तो त्याच्या गुंडांना एकत्र करुन पाठवतो. अचानक मधुभाऊंना वाचवण्यासाठी जानकी गुंडांसमोर येतचे. या सगळ्यात तिच्या हाताला गोळी लागते. जानकी बेशुद्ध होते.




वाचा: मेगास्टार महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?
नेमकं काय झालं?
हृषिकेश जानकीला घेऊन तातडीने डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर जानकीवर उपचार करतात. तिला मलमपट्टी करतात. पण या सगळ्यात दिग्दर्शकाकडून झालेली चूक नेटकऱ्यांनी पकडली आहे. जानकीच्या हाताला गोळी लागल्यावर डॉक्टर तिला मलमपट्टी करतात. पण, डॉक्टरांनी ब्लाऊजवरच मलमपट्टी केल्याचा सीन मालिकेत दाखवण्यात आला आहे. हा सीन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकजण यावर ‘असा कोणता डॉक्टर आहे जो थेट ब्लाऊजवर मलमपट्टी करतो’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट
सोशल मीडियावर मालिकेतील हा सीन पाहून नेटकऱ्य़ांनी मजेशीर प्रश्न विचारले आहेत. एका यूजरने जानकीचा मालिकेतील मलमपट्टी करताना फोटो आणि खाली मुन्नाभाई एमबीबीएसमधील संजय दत्तचा फोटो लावला आहे. त्यावर ‘हा करोना बॅचचा डॉक्टर आहे का??? ब्लाऊजच्या वरतीच मलमपट्टी कशी काय बांधतोय’ असे लिहिण्यात आले आहे. हे मीम्स तुफान व्हायरल होत आहे. तसेच हे मीम्स शेअर करत, ‘एकतर मालिका काढणारे तरी येडे नाहीतर बघणारे तरी येडे’ असे लिहिले आहे.