“मी पुन्हा तेच तेच….”, प्रसिद्ध अभिनेत्याने 10 वर्षांपासून अभिनयाशी नातं तोडलं होतं; आता सांगितलं खरं कारण

प्रसिद्ध अभिनेत्याने 10 वर्ष अभिनयापासून रजा घेतली होती. अभिनयापासून लांब राहण्याचं कारण या अभिनेत्याने आता स्पष्ट केलं आहे. "

मी पुन्हा तेच तेच...., प्रसिद्ध अभिनेत्याने 10 वर्षांपासून अभिनयाशी नातं तोडलं होतं; आता सांगितलं खरं कारण
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 1:03 PM

बऱ्याच मालिका, चित्रपट केल्यानंतर एका अभिनेत्याने अभिनयापासून लांब राहणे पसंत केले होते. हा अभिनेता तब्बल १० वर्ष आपल्या क्षेत्रापासून दूर राहिला होता. याच कारण त्याने आता शेअर केलं आहे.

‘या सुखांनो या’, ‘वहिनीसाहेब’, ‘सासूबाई गेल्या चोरीला’, ‘बेरीज वजाबाकी’या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे गिरीश परदेशी. गिरीशने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे. मात्र, गेल्या 10 वर्षांत तो कुठेही दिसला नाही. त्याने आपल्या क्षेत्रापासून दूर राहणे का पसंत केले याचं कारण त्याने आता एका मुलाखतीत त्याने याचे सांगितले आहे.

अभिनेता गिरीश परदेशीने इतक्या वर्ष क्षेत्रापासून लांब राहिल्यानंतर 10 वर्षांनी कमबॅक केलं आहे. अभिनेत्याने ‘उदे गं अंबे उदे’ मालिकेतून पुनरागमन केले आहे. दरम्याम गिरीशने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या अभिनयापासून दूर राहण्यावरही भाष्य करत त्याचे कारण सांगितले आहे.

गिरीशने सांगितले की, “2014 साली महेश कोठारेसरांची मी शेवटची मालिका केली होती. स्टार प्रवाहवर ‘जयो स्तुते’ ही मालिका होती.त्या मालिकेत मी नकारात्मक भूमिका केली होती; जी नंतर सकारात्मक झाली. एकूणच त्याच्या पूर्वी चॅनेल्स खुली होण्याच्या आधीपासून मी अनेक वर्षे मालिका करत होतो. 1999 पासून मालिकेत काम करत होतो. म्हणजे तेव्हा फक्त एकच चॅनेल होतं. ‘अल्फा मराठी’ असं चॅनेल आलं होतं आणि ‘आपलं सह्याद्री’ होतं. ‘सह्याद्री’मध्ये मराठी मालिकांचा स्लॉट फक्त दुपारी असायचा. तेव्हापासून मी मालिकांमध्ये कामं करत असल्यामुळे म्हणजे 1999 ते 2014 इतकी वर्षे मी टेलिव्हिजनवर व्यतीत केली. चांगल्या चांगल्या भूमिका केल्या; पण कुठेतरी साचलेपण यायला लागलं होतं. मी पुन्हा पुन्हा तेच तेच माध्यम करतोय. मला टेकिंग कळायला लागलं, लिखाण कळायला लागलं आणि कलाकार म्हणून मी समृद्ध आहे आणि मला ती समृद्धता अनुभवायची होती. अर्थात, पैशाचा प्रश्न होताच. समजा, मी मालिका केल्या नाहीत तर माझ्याकडे अर्थार्जन कुठून येणार आणि मग मी विचार केला की, माझ्याकडे थिएटरचं ट्रेनिंग आहे. मग प्रशिक्षणाकडे माझा मोर्चा वळवला आणि चांगल्या चांगल्या संधी तशा यायला लागल्या. तेव्हा मी ब्रेक घेतला.”

पुढे तो म्हणाला “प्रशिक्षणामध्येसुद्धा मी बरंच काम केलं. तर आयुष्याची वेगळी बाजू मी या 10 वर्षांत खूप छान एक्सप्लोअर केली. मी प्राच्यविद्या म्हणजे मी एमए इन इंडोलॉजी पारंगत झालो. इंडोलॉजी म्हणजे अश्मयुगीन भारत, सिंधू संस्कृती, वेदकालीन भारत तिथपासून 12 व्या शतकापर्यंत आपला जो भारत आहे, त्याची संस्कृती, तत्त्वज्ञान व इतिहास यांचा अभ्यास मी केला. अय्यंगार योगाचे ट्रेनिंग घेतले.”

‘उदे गं अंबे उदे’ मालिकेतील भूमिकेविषयी बोलताना अभिनेत्याने म्हटले, “महेश कोठारे सरांच्या ऑफिसमधून फोन आला की, तुम्ही काम कराल का? तर मी महेश कोठारे सर, त्यांची टीम, स्टार प्रवाहची टीम या सगळ्यांना ओळखतच होतो. तर मला वाटत होतं की हे छान आहे. ते घरपण कुठेतरी मला जाणवलं म्हणून मी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा आलो.”

गिरीशला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवरील मालिकेच्या माध्यमातून त्याच्या अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची संधी मिळाली. आणि नक्कीच त्याने याबद्दल आभार मानले आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.