बॉलिवूडच्या सुपरस्टारवर अचानक घराची जबाबदारी, पोटासाठी मजबूरी म्हणून त्याने केलं हे काम, आता जगतोय रॉयल लाईफ!
काही कलाकार असे आहेत ज्यांच्याकडे एक वेळ राहायला घर नव्हतं, खायला अन्नदेखील नव्हतं. अशा परिस्थितीत देखील त्यांनी मोठा संघर्ष करत सिनेसृष्टीत स्वतःचे एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आज काही असे कलाकार आहेत ज्यांनी मोठा संघर्ष करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर याच कलाकारांमध्ये बॉलीवूडच्या हिरो नंबर वन अर्थातच गोविंदा यांचा देखील समावेश आहे. गोविंदा आज बॉलीवूडचे सुपरस्टार आहेत, पण त्यांनी देखील सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे.
गोविंदा आज बॉलीवूडचे सुपरस्टार आहेत. बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये आज त्यांच्या नावाचा देखील समावेश आहे. आज गोविंदा चित्रपटांमध्ये काम जरी करत नसले तरीही त्यांचा स्टार्डम आजही कायम आहे. त्यांचा चहाचा वर्ग आजही लाखोंच्या संख्येत आहे. गोविंदा यांचा उत्कृष्ट अभिनय, कॉमेडी, डान्स या गोष्टींमुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या डान्समुळे, कॉमेडीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. पण गोविंदा यांनी बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मोठ्या संघर्ष केला आहे.
जेव्हा गोविंदा बॉलीवूडमध्ये संघर्ष करण्यासाठी आले होते त्यावेळी अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती यांची क्रेज मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे गोविंदा यांनी ठरवले होते की आपल्याला जर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल, घर चालवायचं असेल तर आपल्याला फक्त अभिनयच नाही तर काहीतरी वेगळं करावं लागेल.
गोविंदा यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या संघर्षाबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा सिनेसृष्टीत ते नवीन होते तेव्हा त्यांना नेहमी वाटायचं की सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं शिकावं लागेल. त्यामुळे त्यांनी वेगळं काहीतरी करण्यासाठी ते डान्स शिकले होते. त्यानंतर गोविंदांच्या डान्समुळे त्यांचा चाहता वर्ग ही मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली.
गोविंदा यांचा उत्कृष्ट असा डान्स पाहताच निर्मात्यांनी चित्रपटांमध्ये त्यांची खास गाणी ठेवली होती. यामध्ये आपके आ जाने से, स्ट्रीट डान्सर या गाण्यांमध्ये गोविंदाचा डान्स चांगलाच प्रसिद्ध झाला होता. तर गोविंदाच्या याच डान्समुळे ते बॉलीवूडमध्ये सुपरस्टार झाले आहेत. विशेष म्हणजे गोविंदांची कॉपी अनेक कलाकारांनी केली होती परंतु त्यांच्यासारखं आजपर्यंत कोणीही बनू शकलेले नाहीये.
ज्यावेळी गोविंदा बॉलीवूड मध्ये करिअर करण्यासाठी आले होते त्यावेळी मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या सुपरस्टार्स प्रमाणे आपला देखील ठसा उमटवण्यासाठी गोविंदा यांनी वेगळं काहीतरी शिकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते बळजबरीने डान्स शिकले, पण आज गोविंदांना बळजबरीने शिकलेल्या डान्समुळे त्यांचं नशीब उजळलं आणि त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली आहे.