“आम्ही एकमेकांना शिव्या-शाप देतच असतो..”; गोविंदाच्या पत्नीकडून खुलासा

| Updated on: Dec 27, 2024 | 12:44 PM

अभिनेता गोविंदासोबतच्या नात्याबद्दल त्याची पत्नी सुनिता अहुजा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. आमचं नातं सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणे नाही, असं तिने म्हटलंय. त्याचसोबत आम्ही सतत एकमेकांना शिव्या-शाप देतच असतो, असं तिने सांगितलंय.

आम्ही एकमेकांना शिव्या-शाप देतच असतो..; गोविंदाच्या पत्नीकडून खुलासा
Govinda and Sunita Ahuja
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता गोविंदाने 1987 मध्ये सुनिताशी लग्न केलं. त्यावेळी गोविंदा 24 वर्षांचा आणि सुनिता 18 वर्षांची होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिता गोविंदासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आमचं नातं सर्वसामान्य जोडप्यांपेक्षा थोडं वेगळं असून आम्ही थेट एकमेकांच्या तोंडासमोर जे आहे ते बोलतो, असं सुनिता म्हणाली. या मुलाखतीत सुनिताला विचारण्यात आलं की, जेव्हा गोविंदा इतर अभिनेत्रींसोबत काम करतो, ऑनस्क्रीन रोमान्स करतो.. तेव्हा तिला काय वाटतं? यावर सुनिताने स्पष्ट सांगितलं की, आमचं नातं हे सर्वसामान्य पती-पत्नीच्या नात्यासारखं नाही.

सुनिता याविषयी पुढे म्हणाली, “मला आजपर्यंत असं कधी जाणवलं नाही की आम्ही पती-पत्नी आहोत. आमच्या शिव्या-शाप चालूच असतात. मी तर अनेकदा गोविंदाला मस्करीत म्हणते की, मला आजपर्यंत विश्वास होत नाही की तू माझा पती आहेस.” गोविंदा आणि सुनिता यांना यशवर्धन हा मुलगा आणि टिना ही मुलगा आहे. एका मुलाखतीत गोविंदाने सुनितासोबतच्या डेटिंग लाइफबद्दल सांगितलं होतं, “ती खूप मॉडर्न होती. तिला डेट करताना मलाच भीती वाटायची की कोणी काही बोलेल. इतकी ती लहान होती. आम्ही दोघं त्यावेळी खूप तरुण होतो. ”

हे सुद्धा वाचा

आणखी एका मुलाखतीत गोविंदाने खुद्द पत्नी सुनितासमोर कबुली दिली होती की, जर ती नसती तर त्याने नक्कीच अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत फ्लर्ट केलं असतं. याच मुलाखतीत गोविंदासोबत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची जोडी कोणती असती, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुनिताने लगेच माधुरीचं नाव घेतलं होतं. “गोविंदाला माधुरी दीक्षित खूप आवडते”, असं ती म्हणाली होती. त्यावर गोविंदा पुढे सांगतो, “मला रेखाजीसुद्धा खूप आवडतात. आजपर्यंत माधुरी आणि रेखा यांनी इंडस्ट्रीत कोणतीच कॉन्ट्रोवर्सी निर्माण केली नाही. जी व्यक्ती आतून सुंदर असते, ती बाहेरूनही कधीच आपलं सौंदर्य गमावत नाही. या दोघी अभिनेत्री तशाच आहेत. जर माझ्या आयुष्यात सुनिता नसती तर मी नक्कीच माधुरीसोबत फ्लर्ट केलं असतं.”