Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची नात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली…

बच्चन कुटुंब सध्या बरेच चर्चेत आहे. ऐश्वर्या- अभिषेकचं नातं, बच्चन कुटुंबियांपासून राखलेली दूरी, यामुळे त्यांच्याबद्दल बऱ्याच अफवा उडत असून अभिषेक-ऐश्वर्या वेगळे होत असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. त्याचदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या नातीने एक महत्वाचे विधान केले आहे.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची नात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली...
अमिताभ बच्चन यांची नात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार?Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 27, 2024 | 2:10 PM

बॉलिवूडमधलं प्रख्यात सेलिब्रिटी कुटुंब बच्चन फॅमिली हे बरंच चर्चेत आहे. अभिषेक-ऐश्वर्या यांच्यातीव बेबनावामुळे कुटुंबात सगळं काही आलबेल नसल्याच्या अफवा उठत आहेत. याचदरम्यान अमिताभ यांच्या नातीने एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. नव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी आहे. शोबिझचा भाग नसतानाही, नव्याचा मोठा चाहतावर्ग आहे आणि तिचे पॉडकास्ट व्हॉट द हेल नव्या? याचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले. नव्या तिच्या वडिलांच्या निखिल नंदा यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत आहे. तिने फॅमिली बिझनेसमध्ये काम करण्यास सुरूवात केली आहे. एवढंच नव्हे तर नव्याने नुकतीत आयआयएम अहमदाबादमध्ये एमबीसाठी प्रवेश घेतला . या सर्वांदरम्यान तिचा एक इंटरव्ह्यू समोर आला असून कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे ती देखील मनोरंजन सृष्टीत येणार का , ॲक्टिंग करणार का ? याबद्दल खुलासा केला आहे.

अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार नव्या ?

नुकत्याच एका कार्यक्रमात ती सहभागी झाली होती, तेव्हा तिने ॲक्टिंग करिअरबद्दल मोठा खुलासा केला. मला अभिनय करण्यात, ॲक्टिंग करण्यात काहीच रस नाही, असे तिने स्पष्ट केले. हा पूर्णपणे माझा स्वत:चा निर्णय आहे, असेही नव्याने सांगितलं. नव्याचा भाऊ अगस्त्य नंदा पासून ते तिचे आजी आजोबा , अमिताभ, जया बच्चन, तिचा मामा अभिषेक, मामी ऐश्वर्या राय बच्चन हे सर्वजण मनोरंजन उद्योगात सक्रिय आहेत. नवीन म्हणाली, “मी कोणत्याही पार्श्वभूमीतून आलेली असली तरी मला हे करायचे होते. आज वास्तवात मला जी संधि मिळाली त्यासाठी मी कृतज्ञ आहे. भारतातील अनेक लोकांसाठी ही रिॲलिटी नाही. पण मला कधीच अभिनय करायचा नवह्ता, त्यात नाही” असं तिने सांगितलं.

आयआयएम प्रवेशानंतर ट्रोलिंगचा कसा केला सामना ?

काही दिवसांपूर्वीच तिने IIM अहमदाबादमध्ये प्रवेश मिळाल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती, पण यावरून काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं होतं. त्यावरही तिला प्रश्न विचारण्यात आला. ‘लोकं जे बोलतात, त्याबद्दल मी वाईट वाटून घेत नाही. लोकांचा फीडबॅक काय मिळतो, ते पाहणं, स्वीकार करणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे मी एक चांगली माणूस , चांगली उद्योजिका आणि एका चांगली भारतीय बनू शकते. लोकांच्या फीडबॅककडे योग्य दृष्टीकोनातून पाहणं खूप गरजेचं आहे’असंही ती म्हणाली. ‘ लोकांच्या प्रतिक्रियांचा मी सकारात्मकपणे विचार केला तर माझ्यात आणि माझ्या कामात चांगले बदल घडू शकतील. त्यामुळे लोक नकारात्मकतेने काही बोलत असतील तरी त्याबद्दल फार विचार न करता स्वत:त काय बदल घडवता येतील हे मी पाहते’, असं नव्याने नमूद केलं.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.