Drama Unlock : ‘मराठी माणूस नाट्यवेडा’, नाटकाच्या तिकिट विक्रीला नाट्यप्रेमींचा उत्तम प्रतिसाद

आता आठ महिन्यांनंतर नाट्यगृह सुरू होणार म्हटल्यावर नाट्यप्रेमी उत्सुक आहेत. आता ‘मराठी माणूस नाट्यवेडा असतो’ याची प्रचिती रसिकांनी रविवारी दिली.(great response from drama lovers to the sale of tickets for the play)

Drama Unlock : 'मराठी माणूस नाट्यवेडा', नाटकाच्या तिकिट विक्रीला नाट्यप्रेमींचा उत्तम प्रतिसाद
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 11:34 AM

मुंबई : जगभरात कोरोना आला आणि सगळ ठप्प झालं. कोरोनामुळे जवळजवळ आठ महिने लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर आता जग पूर्वपदावर येत आहे. आता आठ महिन्यांनंतर नाट्यगृह सुरू होणार म्हटल्यावर नाट्यप्रेमी उत्सुक आहेत. आता ‘मराठी माणूस नाट्यवेडा असतो’ याची प्रचिती रसिकांनी रविवारी दिली. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक हाऊसफूल झालं. या नाटकाच्या सगळे तिकिट अवघ्या तासाभरात संपले. त्यामुळे कलाकारांचा उत्साह आता द्विगुणित झाला आहे. (Great response from drama lovers to the sale of tickets for the play).

कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्चपासून नाट्यगृह बंद होती. आता काही अटींसह महाराष्ट्र सरकारनं ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी, मात्र काही कलाकार आपआपल्या गावी गेल्यानं नाटकांच्या प्रयोगाला थोडा उशीर झाला. आता प्रशांत दामले आणि कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा शनिवारी (१२ डिसेंबर) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे, तर रविवारी (१३ डिसेंबर) बालगंधर्व रंगमंदिर आणि प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात प्रयोग होणार आहेत. या नाटकाच्या तिकिटांची विक्री रविवारी करण्यात आली. त्यानिमित्त प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी या तीनही नाटय़गृहांना भेट देऊन पहिल्या पाच नाटक प्रेमींना तिकिट दिली. यावेळी नाट्यप्रेमींच्या हस्ते नारळ फोडून तिकिट विक्रीचं उद्घाटन करण्यात आलं.

अवघ्या ‘एका तासात तिकिटांची विक्री झाल्यानं मराठी माणूस नाट्यवेडा आहे’ असं मत प्रशांत दामले यांनी व्यक्त केलं. सोबतच ‘तिकिट विक्री झाल्याचा आनंद आहेच मात्र आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं दडपण आहे’, असं कविता लाड यांनी म्हटलं. या तिकिट विक्रीच्या शुभारंभावेळी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद कोथरूड शाखा, संवाद आणि पुणेकर रसिकांतर्फे दामले आणि लाड यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच या कार्यक्रमासाठी समीर हंपी, प्रवीण बर्वे, सुनील महाजन, सत्यजित धांडेकर उपस्थित होते. (Great response from drama lovers to the sale of tickets for the play)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.