Happy Birthaday Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिषेक त्यांच्या करियरमध्ये काही असे सिनेमे दिले, ज्यामुळे तो कायम चाहत्यांमध्ये चर्चेत राहिला. शिवाय महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा असल्याने कायम स्टारकिड्सच्या यादीमध्ये अव्वल स्थानी राहिला. पण बॉलिवूडमध्ये अभिनेत्याने स्वतःची खास तयार केली. शिवाय अभिषेक त्याच्या शांत स्वभावामुळे देखील ओळखला जातो. अभिषेक याने स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला. वयाच्या ९ व्या वर्षी अभिनेत्याला एका गंभीर आजाराचं निदान झालं.
मिडिया रिपोर्टनुसार, अभिषेक जेव्हा फक्त ९ वर्षांचा होता, तेव्हा त्याला एक गंभीर आजार झाला होता. ज्यामुळे अभिनेत्याला बोलताना, वाचताना, लिहिताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आजाराचं निदान झाल्यानंतर अभिनेत्याला वयाच्या ९ व्या वर्षी युरोपीयन शाळेत पाठवण्यात आलं. कारण त्याठिकाणी अभिनेत्यावर योग्य उपचार होतील.
मिळालेल्या माहितीनुसार, खुद्द अभिषेक याने त्याला झालेल्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला. अभिनेता आमिर खान स्टारर ‘तारे जमीन पर’ सिनेमादरम्यान अभिषेक याने एका मुलाखतीत वयाच्या ९ व्या वर्षी झालेल्या आजाराबद्दल सांगितलं. ज्यामुळे अनेकांना अभिनेत्याच्या आजाराबद्दल माहिती झालं.
मिडियारिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन याला लहानपणी डिस्लेक्सिया (Dyslexia) हा आजार झाला होता. डिस्लेक्सिया एक असा आजार आहे, ज्यामध्ये लहान मुलांना अक्षरं कळत नाहीत. त्यांच्या वाचण्यात, लिहिण्यात, बोलण्यात अनेक अडचणी असतात. डिस्लेक्सिया आजाराला झुंज देणारे मुलं इतर मुलांच्या तुलनेत कमी हुशार असतात. पण अशा मुलांमध्ये क्रिएटीव्ह गोष्टी अनेक असतात. या आजाराचं निदान लाहानपणीच होतं.
अभिषेक बच्चन त्याच्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत मोकळेपणाने शेअर करतो. अभिनेता पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan) हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची ओळख ‘धूम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. (abhishek bachchan birthday videos)
२० एप्रिल २००७ साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर १६ नोव्हेंबर २०११ मध्ये ऐश्वर्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे. स्टारकिड्स म्हणून आराध्या देखील प्रचंड लोकप्रिय आहे. आराध्या हिच्यासोबत ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.