Happy Birthday Aditya Chopra | लव्हस्टोरीचा मोठा रेकॉर्ड, इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झाला आदित्य चोप्राचा ‘DDLJ’
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांना चर्चेत राहणे अजिबात आवडत नाही. परंतु, ते आपल्या कामासाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे.
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांना चर्चेत राहणे अजिबात आवडत नाही. परंतु, ते आपल्या कामासाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. आदित्य बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहे. आपण आदित्यबद्दल बोलत असू आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाचा उल्लेख होणार नाही, असे होऊच शकत नाही (Happy Birthday Aditya Chopra know about his record setting film DDLJ).
या चित्रपटाद्वारे आदित्यने दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आदित्यने केवळ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही, तर ते स्वत: या चित्रपटाचे लेखक देखील होते. हिंदी सिनेसृष्टीतील प्रत्येक चाहत्याला माहित आहेत की, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने किती विक्रम केले आहेत. या चित्रपटाने बर्याच विक्रमांची नोंद केली आहे.
गाजलेली लव्हस्टोरी
‘DDLJ’ हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतीय सिनेमात प्रेमकथेचा वेगळा आयाम दाखवला. या माध्यमातून हिंदी चित्रपटात यापूर्वी कधीही न पाहिलेली प्रेमकथा वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आली होती. कारण या चित्रपटामध्ये भारतीय संस्कृतीची परंपरा, पाश्चिमात्य प्रेमाची चव होती. आजपर्यंत ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’सारखा चित्रपट बनलेला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आजही एखादी नवी लव्हस्टोरी फिल्म रिलीज झाली की तिची तुलना डीडीएलजेसोबत केली जाते. त्याकाळी या चित्रपटाने केलेले विक्रम आजचे चित्रपटदेखील करु शकलेले नाहीत.
तगडी स्टार कास्ट
या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा याने जितकी मेहनत घेतली तितकीच शाहरुख खान आणि काजोल यांनी देखील घेतली. शाहरुख आणि काजोलची जोडी या चित्रपटानंतर इतकी हिट ठरली की, आजही जेव्हा सर्वोत्कृष्ट ऑनस्क्रीन जोडीची चर्चा होते, तेव्हा त्या दोघांचेही नाव पहिले येते. या दोघांमधील केमिस्ट्रीची जादू दाखवणाऱ्या आदित्य चोप्राचा हा चित्रपट आजही चाहत्यांच्या मनात घर करून बसला आहे (Happy Birthday Aditya Chopra know about his record setting film DDLJ).
या दोघांशिवाय अमरीश पुरी, अनुपम खेर आणि उर्वरित कलाकारांनीही आपल्या आपल्या अभिनयाची कस लावली. प्रत्येक पात्राने आपले काम इतके चांगले केले होते की, यामुळेच चित्रपटाचे कोणतेही दृश्य कुठेही फिके पडले नाही.
‘या’ चित्रपटानंतर झाले नवे बदल
या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय सिनेमामध्येही अनेक बदल झाले. निर्मात्यांची फिल्मिंग स्टाईल बदलली. या चित्रपटापूर्वी टीव्हीवर चित्रपट मेकिंग कधीच दाखवले गेले नव्हते. परंतु, या चित्रपटाने मेकिंग दाखवले, त्यानंतर आता बहुतेक चित्रपट रिलीजनंतर मेकिंग देखील दाखवतात.
आजही चित्रपटगृहात झळकतो!
डीडीएलजे (दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ते लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी मराठा मंदिर थिएटरमध्ये चित्रपटाचा शो लावला जातो.
यशराज असताना लेकाची कमाल
ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्राचे वडील यशराज यांनीना आधीपासूनच ‘यशराज फिल्म्स’ला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. परंतु, या चित्रपटानंतर आदित्यने त्यांचा हा वारसा आणखी पुढे नेला. आदित्यने हा चित्रपट केवळ 3-4 आठवड्यांत लिहिला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि 10 फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
(Happy Birthday Aditya Chopra know about his record setting film DDLJ)
हेही वाचा :
Video | जुही चावलाचं गायन कौशल्य पाहून सुष्मिता सेनही झाली अवाक्, पाहा व्हिडीओ
Bollywood Expensive Cars | बॉलिवूडकरांचे लक्झरी शौक, कोरोना काळातही खरेदी केल्या महागड्या गाड्या!
बिग बींवर लागला होता दंगल भडकवल्याचा आरोप, श्री अकाल तख्त साहिबला लिहिलेले जुने पत्र व्हायरल!#AmitabhBachchan | #Bollywood https://t.co/c7hZBwQtec
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021