Happy Birthday Hariharan | बॉलिवूड-टॉलिवूडच नव्हे तर, भोजपुरीमध्येही घुमला रोमँटिक आवाज, वाचा गायक हरिहरन यांच्याबद्दल…
हरिहरन यांनी हिंदीव्यतिरिक्त मल्याळम, तेलगू, कन्नड, भोजपुरी आणि मराठी भाषांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरविली आहे. 1992 सालापासून त्यांनी ए.आर.रहमानबरोबर गाणे गाण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही.
मुंबई : आपल्या मखमली आवाजाने चाहत्यांना वेड लावणारे गायक हरिहरन (Hariharan) यांना कोण ओळखत नाही. हरिहरनची गाणी आजही चाहत्यांच्या जिभेवर नेहमीच रेंगाळताना दिसतात. गायक हरिहरन यांचा जन्म 3 एप्रिल 1955 रोजी केरळातील एका तमिळ कुटुंबात झाला होता. हरिहरन यांना संगीताचा वारसा मिळाला आहे, कारण ते एका संगीतकाराच्या कुटुंबात जन्मला आले. अगदी लहान वयातच त्यांना संगीत शिकण्याचा ध्यास लागला होता (Happy Birthday Hariharan know about Singer Hariharan music Career).
हरिहरन यांनी हिंदीव्यतिरिक्त मल्याळम, तेलगू, कन्नड, भोजपुरी आणि मराठी भाषांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरविली आहे. 1992 सालापासून त्यांनी ए.आर.रहमानबरोबर गाणे गाण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. संगीत कारकिर्दीत त्यांना 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेहे. वाढदिवसाच्या खास निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
‘रोजा जानेमन….’ हे गाणं आठवताच पहिला हरिहरन यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. जे मऊ, सुमधुर, मखमली आणि तारासप्तकपर्यंत पोहोचणाऱ्या सुरांचे जादुगार आहेत. काही वर्षांपूर्वी एका टीव्ही मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारण्यात आले होते की, भजन-गझल गायनातून, आता चित्रपट पार्श्वगायक आणि तेही यशाच्या शिखरावर असताना, आपल्याला काय वाटत?
या प्रश्नावर उत्तर देताना हरिहरन म्हणाले, ‘आम्ही संगीताला वाहून घेतलेले लोक आहोत, आम्ही सतत गात असतो आणिनवे प्रयोग करत असतो. आम्ही नेहमीच शिकत असतो. आमची पदवी कधीच पूर्ण होत नाही, किंवा आमचा दीक्षांत समारंभ होत नाही (Happy Birthday Hariharan know about Singer Hariharan music Career).
गुरूंची कृपा!
आम्ही फक्त शिकत असतो. ही तर गुरुकृपा आहे की, लोक आवडीने ते पसंत करतात. परंतु, गुरू नेहमी या गोष्टींचा सराव आणि रियाज करायला सांगतात. म्हणून, मी अजूनही स्वत:त सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो.
कारकीर्दीची अशी झाली सुरूवात
हरिहरनने आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीलाच अनेक मैफिली केल्या आणि अशा प्रकारे त्यांची टीव्हीच्या जगात एन्ट्री झाली. ‘जुनून’ या मालिकेच्या शीर्षक गीतामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि नंतर त्यांचा आवाज इतर अनेक मालिकांमध्ये झळकला. मात्र, या क्षेत्रात येण्यापूर्वी हरिहरन यांनी 1977मध्ये ‘गमन’ या चित्रपटासाठी गाणे गायले होते. दिवंगत संगीत दिग्दर्शक जयदेव यांना त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करण्याचे श्रेय दिले.
सतत उंचावली कारकीर्द
यानंतर हरिहरन नेहमी पुढे जात राहिले, कधीही मागे वळून पहिले नाही. 1992हे वर्ष ए.आर. रहमानसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून नवीन होते. त्यांच्यासोबत हरिहरन यांनी देखील संगीतक्षेत्रात आपले नाव उंचावले. ‘रोजा’साठी मणिरत्नम यांनी रहमान आणि हरिहरन या दोघांवरही विश्वास टाकला. आणि हा चित्रपट व यातील गाणी सुपर हिट झाली. 1998 मध्ये हरिहरन आणि अनु मलिकबरोबर ‘बॉर्डर’ या हिंदी चित्रपटासाठी काम केले. त्यावर्षी “मेरे दुश्मन मेरे भाई” या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2009 मध्ये त्यांना जोगवा या चित्रपटातील ‘जीव रंगला’ या मराठी गाण्यासाठी आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
(Happy Birthday Hariharan know about Singer Hariharan music Career)
हेही वाचा :
बिग बी आणि रश्मिकाच्या ‘Good Bye’मध्ये ‘या’ टीव्ही अभिनेत्याची एंट्री, गाजवणार मोठा पडदा!
Happy Birthday Prabhu Deva | दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमापायी मोडला 16 वर्षांचा संसार, चित्रपटाच्या सेटवर जुळले सुत, वाचा प्रभु देवाबद्दल…#PrabhuDeva | #HappyBirthday | #Entertainmenthttps://t.co/wIluWZOVD7
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 3, 2021