Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Ram Gopal Varma | जेव्हा राम गोपाल वर्मांचं अफेअर पत्नीच्या कानावर पडलं! वाचा मनोरंजन विश्वातल्या ‘विवादित’ दिग्दर्शकाबद्दल…

दिग्दर्शक-निर्माता राम गोपाल वर्मा यांचा आज 60वा वाढदिवस आहे. राम गोपाल वर्मा यांनी 'सत्या' (Satya), 'सरकार' (Sarkar), 'रंगीला' (Rangeela) असे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडमध्ये दिले आहेत.

Happy Birthday Ram Gopal Varma | जेव्हा राम गोपाल वर्मांचं अफेअर पत्नीच्या कानावर पडलं! वाचा मनोरंजन विश्वातल्या ‘विवादित’ दिग्दर्शकाबद्दल...
राम गोपाल वर्मा
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 10:27 AM

मुंबई : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे मनोरंजन विश्वातील असे एक नाव आहे, जे नेहमी काहीना काही कारणाने चर्चेत असते. राम गोपाल वर्मा सतत आपली मतं मांडत असतात, मग ती चित्रपट उद्योगाशी संबंधित असो की देशातील इतर कुठले विषय. दिग्दर्शक-निर्माता राम गोपाल वर्मा यांचा आज 60वा वाढदिवस आहे. राम गोपाल वर्मा यांनी ‘सत्या’ (Satya), ‘सरकार’ (Sarkar), ‘रंगीला’ (Rangeela) असे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडमध्ये दिले आहेत. राम गोपाल वर्मा यांनी हिंदीच नव्हे तर, दक्षिण भारतीय चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे. टॉलीवूड आणि बॉलिवूड या दोन्ही ठिकाणी त्यांनी नाव कमावले आहे (Happy Birthday Ram Gopal Varma when ram’s wife heard about his affair with actress).

चित्रपटसृष्टीत नाव कमावले, पण लग्न केल्यानंतर एखाद्या अभिनेत्रीवर प्रेम करणे त्यांना खूप महागात पडले. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याशी राम गोपाल वर्मांचे अफेयर त्याकाळी खूप चर्चेत आले होते. राम गोपाल वर्माने पहिल्यांदा ‘सत्या’ चित्रपटात उर्मिलाबरोबर काम केले. यानंतर त्यांनी उर्मिलाबरोबर ‘रंगीला’ हा चित्रपट बनवला, ज्यामध्ये आमीर खान आणि जॅकी श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

जेव्हा राम गोपाल वर्मांच्या पत्नीला कुणकुण लागली…

राम गोपाल वर्मा यांचा ‘रंगीला’ हा चित्रपट उर्मिलासाठी मैलाचा दगड ठरला. चित्रपटाने उर्मिलाला यशाच्या शिखरावर नेले, जिथून कोणालाही मागे वळून पाहायला आवडत नाही. ‘रंगीला’ चित्रपटानंतरच दोघांमधील अफेयरची जोरदार चर्चा सुरू झाल्याचे बोलले जाते. यानंतर उर्मिला मातोंडकरला राम गोपाल वर्माच्या प्रत्येक चित्रपटात अभिनेत्री म्हणून घेतले जाऊ लागले. फिल्म इंडस्ट्रीच्या कॉरिडोरमध्ये सुरू असलेल्या दोघांच्या अफेअरची ही चर्चा राम गोपाल वर्मा यांच्या घरीही पोहोचली (Happy Birthday Ram Gopal Varma when ram’s wife heard about his affair with actress).

चर्चा तर होणारच!

राम गोपाल वर्मा यांची पत्नी रत्ना यांना जेव्हा पतीच्या अफेअरबद्दल कळले, तेव्हा जणू काही त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. या वृत्तामुळे त्या खूप रागावल्या होत्या. त्या काळात माध्यमांमध्ये अशी बातमी पसरली होती की, राम गोपाल वर्माची पत्नी रत्ना यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या कानाखाली मारली. तथापि, याची पुष्टी कधीच होऊ शकली नाही किंवा उर्मिलाने कधीही राम गोपाल वर्मा यांच्याशी त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही. मात्र, असेही म्हटले जाते की, उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या प्रेम प्रकरणातूनच दिग्दर्शकाची पत्नी रत्ना यांनी घटस्फोट घेतला. परंतु, या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे, याची खात्री देता येत ​​नाही.

(Happy Birthday Ram Gopal Varma when ram’s wife heard about his affair with actress)

हेही वाचा :

PHOTO | धर्मेंद्र ते माधुरी दीक्षित, ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी सहकाऱ्यांच्या मृत्यूनंतर घेतली त्यांची जागा!

Kartik Aaryan | कोरोनामुक्त झालेल्या कार्तिक आर्यनने खरेदी केली Lamborghini, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.