बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज युद्ध झालं होतं का? राज्याला पडलेला प्रश्न, दिग्दर्शक अभिजित देशपांडेंचं उत्तर काय?

| Updated on: Nov 08, 2022 | 1:30 PM

हर हर महादेव चित्रपटातील अनेक प्रसंगांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज युद्ध झालं होतं का? राज्याला पडलेला प्रश्न, दिग्दर्शक अभिजित देशपांडेंचं उत्तर काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः हर हर महादेव (Har Har Mahadev) या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) काळातील अनेक प्रसंगांवर आक्षेप घेण्यात आलाय. चित्रपटातील अनेक प्रसंग आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या घटनांप्रमाणे नाहीत, अशी टीका अनेक संघटनांकडून करण्यात येतेय. विशेषतः बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील युद्धाचा एक प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आलाय. मुळात या दोहोंमध्ये युद्ध झालंच नव्हतं, असा संघटनांचा दावा आहे. मात्र चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी या आक्षेपांना उत्तर दिलं आहे.

‘सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी दिली आहे. ऐतिहासिक चित्रपटांनी प्रसंगांचं परीक्षण कऱण्यासाठी सेन्सॉर बोर्डावर इतिहासकारांचीही नेमणूक असते. त्यांनीही मान्यता दिल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होतो…’

पाहा अभिजित देशपांडे काय म्हणाले?

तसेच आपल्याला आतापर्यंत पाठ्यपुस्तकांमध्ये कळलेल्या इतिहासाच्या पलिकडेही असंख्य घटना असतात, ज्या इतिहासकारांनी अनेक बखरींचा अभ्यास करून मांडलेल्या असतात. त्याच प्रसंगांवर आधारीत दृश्य सिनेमात घेण्यात आली आहेत, असा दावा अभिजित देशपांडे यांनी केलाय.

केळुसकर यांनी1905-06 मध्ये एक पुस्तक लिहिलंय. त्यात चित्रपटातील एक प्रसंग जसाच्या तसा वर्णन केलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या पुस्तकावरून प्रेरणा घेतली आहे. ते असेच इतिहासकार झालेले नाहीत. त्याचा आम्ही अभ्यास केल्यानंतर हे पुरावे मिळाले. तेच आम्ही सेन्सॉर बोर्डाला दिले.

या चित्रपटातील फॅक्ट पटल्या नसतील तर त्यावर आम्ही कोर्टात बोलू शकतो, पण असं थिएटरमध्ये जाऊन कुणाला मारहाण करणं चुकीचं आहे, असा आरोप अभिजीत देशपांडे यांनी केलाय.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना माणुसकीचा संदेश दिला, त्यांच्यासमोरच अशा प्रकारे मारहाण केली जातेय, या सर्वांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागवी, अशी विनंती अभिजीत देशपांडे यांनी केली आहे.

सिनेमात कोणत्याही प्रकारचा अपशब्द वापरण्यात आलेला नाही. आम्ही तशा प्रकारचं स्टेटमेंट जारी केलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे या दोघांनाही सिनेमा पाहण्यासाठी आमंत्रण देणार आहोत. ते जेव्हा हा सिनेमा बघतील, तेव्हा त्यांना तो आवडेल, अशी प्रतिकिया अभिजीत देशपांडे यांनी दिली.