Hardik Pandya Net Worth : नताशाला 70 टक्के संपत्ती दिल्यावर हार्दिकचं काय होणार?; एकूण संपत्ती आहे तरी किती?

हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाला आणि जर त्याला त्याच्या संपत्तीपैकी 70% रक्कम द्यावी लागली तर या भारतीय स्टार क्रिकेटरच्या संपत्तीत लक्षणीय घट होईल. मुंबई इंडियन्सच्या या कर्णधाराकडे चला जाणून घेऊया.

Hardik Pandya Net Worth : नताशाला 70 टक्के संपत्ती दिल्यावर हार्दिकचं काय होणार?; एकूण संपत्ती आहे तरी किती?
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 1:00 PM

भारतीय क्रिकेट टीम (Team India) चा स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या त्याच्या पर्सनला लाईफमुळे बराच चर्चेत आहे. हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्यात सगळं काही आलबेल नाही, अशा बातम्या सध्या समोर येत आहेत. दोघांचा घटस्फोट होऊ शकतो. ते जर कायदेशीररित्या विभक्त झाले तर हार्दिकला त्याची 70 % प्रॉपर्टी नताशाला द्यावी लागू शकते, असेही बोलले जात आहे. मात्र या सगळ्या बातम्या मीडिया रिपोर्टवर आधारित आहेत. फीसदी प्रॉपर्टी नताशा को देना पड़ सकता है. हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाला आणि जर त्याला त्याच्या संपत्तीपैकी 70% रक्कम द्यावी लागली तर मात्र या भारतीय स्टार क्रिकेटरच्या संपत्तीत लक्षणीय घट होईल. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णाधार असलेल्या हार्दिककडे सध्या एकूण किती संपत्ती आहे, ते जाणून घेऊया.

हार्दिक पंड्याचे नेटवर्थ

हार्दिक पांड्या त्याच्या रॉयल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतो. क्रिकेटच्या पीचवर आपल्या अष्टपैलू कामगिरीने चाहत्यांची मने जिंकणारा हार्दिक हा कमाईच्या बाबतीतही अग्रेसर आहे. विविध रिपोर्ट्सनुसार, हार्दिकची एकूण संपत्ती (Hardik Pandya Net Worth) सुमारे 11.4 दशलक्ष डॉलर्स (95 कोटींहून अधिक) आहे. क्रिकेट सामन्यांव्यतिरिक्त, तो ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियाद्वारे देखील भरपूर कमाई करतो.

कमी काळातच बक्कळ कमाई

हार्दिक पांड्याने 2016 साली टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचे क्रिकेट करीअर तर वेगाने वाढलंच पण त्याच्या कमाईतही त्याच वेगाने वाढ झाली आहे. हार्दिकच्या मॅच फीबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या करिअर ग्रोथसोबतच त्याच्या संपत्तीतही खूप वाढ झाली आहे. त्याच्या उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत क्रिकेट आहे. आयपीएल आणि बीसीसीआय देत असलेल्या फीमधून तो बरीच कमाई करतो.

किती आहे महिन्याचा पगार ?

सुरुवातीच्या आयुष्यात बऱ्याच आर्थिक समस्यांचा सामना कराव्या लागणाऱ्या हार्दिक पांड्याकडे आता अफाट संपत्ती आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिकला प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी 20 लाख रुपये, कसोटी सामन्यासाठी 30 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. 2022 च्या रिपोर्टनुसार, IPLमध्ये गुजरात टायटन्सकडून त्याला फी म्हणून 15 कोटी रुपये मिळत होते. मात्र, आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे आणि त्याचा पगारही आधीच्या रकमेच्या आसपास आहे. त्याची महिन्याची कमाई ( अंदाजे) 1.5 कोटी रुपये आहे.

या ब्रँड्समधूनही करतो कमाई

अतिशय प्रसिद्ध खेळाडू असलेला हार्दिक हा सोशल मीडियावरही खूप गाजत असतो. तो अनेक मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिरीत करून बक्कळ पैसा कमावतो. बोट (BoAt), Sin Denim, Gulf Oil India, Villain, Dream11, Xlerate, Souled Store, ॲमेझॉन अलेक्सा (Amazon Alexa), रिलायन्स रिटेल, स्टार स्पोर्ट्स मॉन्स्टर एनर्जी. एसजी क्रिकेट अशा अनेक ब्रँड्सशी तो संलग्न आहे.

आलिशान घराचा मालक

हार्दिक पांड्याच्या लक्झरी लाइफप्रमाणेच त्याचे घर (हार्दिक पांड्या हाऊस) देखील खूप आलिशान आहे. 2016 मध्ये त्याने गुजरातमधील वडोदरा येथील पॉश भागात असलेल्या दिवाळीपुरा येथे सुमारे 6000 स्क्वेअर फुटांचे घर खरेदी केले. या घराची अंदाजे किंमत 3.6 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याने अनेक रिअल-इस्टेट मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि देशात त्याच्याकडे अनेक स्थावर मालमत्ता आहेत.

कार कलेक्शन पहाल तर

घर आणि स्टाइल जितकी शानदार आहे, हार्दिकचे कार कलेक्शनही तितकेच जबरदस्त आहे. त्याच्याकडे 6 कोटींपेक्षा अधिक किमतीची रोल्स रॉयस (Rolls Royce), 4 कोटींची ( अंदाजे) लॅम्बॉर्गिनी (Lamborghini Huracan EVO) के तसेच ऑडी A6, रेंज रोव्हर व्होग (Range Rover Vogue), Jeep Compass, मर्सिडिझ, पोर्श आणि Toyota Etios कार ही आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.