Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Natasa : घटस्फोटानंतर हार्दिक-नताशा मुलासाठी करणार को-पॅरेंटिंग, नक्की असतं तरी काय ?

Parenting Tips : काही कारणांमुळे अनकेदा पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे होतात, घटस्फोट घेतात. अशावेळी मुलाचं काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण काहीवेळा जोडपी, मुलांसाठी को-पॅरेंटिंगचा (सहपालकत्व) निर्णय घेतात. हार्दिक-नताशानेही हाच निर्णय घेतलाय.

Hardik Natasa : घटस्फोटानंतर हार्दिक-नताशा मुलासाठी करणार को-पॅरेंटिंग, नक्की असतं तरी काय ?
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 1:54 PM

आई-वडील बनणं हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो, तो क्षण सर्वांच्याच कायम लक्षात राहणार असतो. आपला अंश, बाळाला वाढवताना पती-पत्नी एकत्र जबाबदारी पार पाडतात. पण काहीवेळेस आपसांतील मतभेद किंवा इतर कारणांमुळे पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे होतात, घटस्फोट घेतात. पण घटस्फोटानंतर मुलांचं काय होतं ? याबद्दल कधी कोणी विचार केला आहे का ?

अशीच परिस्थिती सध्या क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक या दोघांची आहे. त्या दोघांनीही काल एक स्टेटमेंट शेअर करत एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र विबक्त झाल्यानंतरही हार्दिक आणि नताशा त्यांच्या मुलासाठी को-पॅरेंटिंग ( सहपालकत्व) करणार आहेत. पण को-पॅरेंटिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का ? त्याचा नक्की अर्थ काय होतो, हे कसे केले जाते, ते जाणून घेऊया.

को-पॅरेंटिंग चा अर्थ काय ?

को-पॅरेंटिंग किंवा सह-पालकत्व म्हणजे घटस्फोटित पालक आपल्या मुलांना एकत्र वाढवतात. म्हणजेच घटस्फोटानंतर पती-पत्नी म्हणून ते वेगळे होतात, परंतु पालक मुलांचे संगोपन करण्यासाठी, पालक बनून ते त्यांच्या जबाबदाऱ्या एकत्र पार पाडतात. मुलांना प्रेम देणे, मुलांचे संरक्षण करणे, त्यांचे शिक्षण, इतर जबाबदाऱ्या या सर्वांचा भार दोघ मिळून उचलतात. घटस्फोटानंतर, जरी ते (स्त्री- पुरूष) एकाच छताखाली राहत नसले तरीही ते त्यांच्या मुलांना एक स्थिर वातावरण प्रदान करण्याचा प्रयत्न करतात.

मुलांची पूर्ण जबाबदारी

को-पॅरेंटिंग अथवा सह-पालकत्वामध्ये दोन्ही पालकांना त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि इतर जबाबदाऱ्यांची संपूर्ण काळजी घ्यावी लागते. याशिवाय मूल मोठे झाल्यावर पालकांना त्याच्याशी संबंधित अनेक निर्णय एकत्र घ्यावे लागतात. एवढेच नव्हे तर आई-वडील दोघांनाही मुलांसोबत समान आणि चांगला, दर्जेदार वेळ (quality time) घालवावा लागतो. आई-वडील वेगळे होत असले, तरीही दोघांमध्ये चांगला संवाद राहतो. जेणेकरून भविष्यात मुलांच्या गरजा पूर्ण करता येऊ शकतील

को-पॅरेंटिंगची कारणं

को-पॅरेंटिंग करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे पालकांना आपल्या मुलांना आनंदी ठेवता यावे आणि त्यांची काळजी घेता यावी. आई-वडील, दोन्ही पालक मिळून मुलाचे आयुष्य चांगले घडवू शकतात. जेणेकरून मुलांना एकटेपणा जाणवू नये आणि त्याला एकट्याने आव्हानांचा सामना करावा लागू नये.

मात्र को-पॅरेंटिंग करणं इतकही सोपं नसतं. परंतु पालकांची इच्छा असल्यास ते मुलाच्या कल्याणासाठी सह-पालकत्वाचा निर्णय घेऊ शकतात. अनेक सेलिब्रिटी हे को-पॅरेंटिंगचा पर्याय निवडत आहेत. आणि आता या यादीत हार्दिक पांड्या आणि नताशा यांचेही नाव जोडले गेले आहे. घटस्फोटानंतर दोघेही, त्यांचा मुलगा अगस्त्यासाठी को-पॅरेंटिंग करणार आहेत.

को-पॅरेंटिंग करणाऱ्या पालकांमध्ये रोमान्स ?

को-पॅरेंटिंग करणाऱ्या आई-वडिलांमध्ये रोमान्स नसतो, प्रेमाची भावना वगैरे नसते. दोघेही फक्त मुलाच्या आनंदासाठी एकत्र वेळ घालवतात. या नात्याला जॉईंट पॅरेंटिंग असेही म्हणतात. जेव्हा तुम्ही मुलाचे सहपालक असाल तेव्हा तुमच्य़ा वादाचे, मतभेदाचे मुद्दे पुन्हा उगाळू नका. अन्यथा तुमच्या दोघांमधील भांडणं वाढतील आणि मुलावर नकारात्मक परिणाम होईल.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.