मुंबई: लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांनी अनेक कवी, गीतकारांची गाणी गायली आहेत. त्यांची शेकडो गाणी हिट झाली आहेत. या हिट गाण्यांमध्ये ‘हे नवं नवं लुगडं’ हे गाणंही तसंच हिट आहे. कवी, गीतकार दीपशाम मंगळवेढेकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याचा किस्साही तसाच अप्रतिम आहे. (‘he nav nav lugad’ marathi song was also famous in london)
काय आहे किस्सा?
आनंद शिंदे-मिलिंद शिंदे यांची जवा नवीन पोपट हा ही पहिलीच कॅसेट बाजारात येणार होती. त्यासाठी संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या घरी तब्बल महिनाभर रिहर्सल करण्यात आली. या कॅसेटमध्ये गीतकार मानवेल गायकवाड यांची बहुतेक गाणी होती. त्यावेळी दीपशाम मंगळवेढेकर हे विठ्ठल शिंदेंकडे असिस्टंट म्हणून काम करत होते. गाणी कम्पोज करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. मानवेल यांनी दीपशाम मंगळवेढेकर यांना एक गाणं लिहिण्यास सांगितलं. कारण कॅसेटसाठी फक्त सात गाणी तयार झाली होती. त्यावेळी आठ गाण्यांची एक कॅसेट असायची. त्यामुळे एक गाणं कमी पडल्याने गायकवाडांनी मंगळवेढेकरांना हे गाणं लिहिण्यासा सांगितलं. मानवेल यांच्या आग्रहावरून त्यांनी ‘नवं नवं लुगडं’ हे गाणं लिहिलं. परंतु हे गाणं ते आनंद शिंदे यांना द्यायला काही तयार होईनात. कारण आनंद त्यावेळी नवखे गायक होते आणि मंगळवेढेकर हे स्टेबल गीतकार होते. त्यामुळे हा नवीन मुलगा आपल्या गाण्याला काय न्याय देईल असं त्यांना वाटलं. पण हो हो नाही नाही म्हणता अखेर त्यांनी हे गाणं आनंद यांना गायला दिलं अन् गाणं तुफान गाजलं…
भाषेच्या मर्यादा ओलांडल्या
कॅसेट बाजारात आल्यानंतर या कॅसेटने अनेक विक्रम केले. ‘नवं नवं लुगडं’ने प्रादेशिक भाषेतील सर्वात लोकप्रिय गाण्याचा मानही मिळवला. या गाण्याने भाषेच्या मर्यादाही ओलांडल्या. ‘पोपटा’चं गाणं आणि ‘नवं नवं लुगडं’ या गाण्यासाठी पंजाबी आणि हिंदी भाषिकही ही कॅसेट खरेदी करू लागले होते. त्या गाण्याचे बोल होते…
थांब थांब पोरी, मला पाहू दे तरी, जराशी ये इकडं,
कसं तरी दिसं, आता नीट तरी नेसं, हे नवं नवं लुगडं…
कसं सूचलं गाणं?
दीपशाम मंगळवेढेकर यांनी हे गाणं कसं सूचलं याचा किस्साच सांगितलं. हे गाणं सहज सूचलं. घरात पाणी भरायला आलेल्या मुलीच्या अंगावरील कपडे पाहून शब्द स्फूरले आणि गाण्याचा जन्म झाला, असं ते सांगतात. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया जाधव आणि त्यांचे पती शाहजी काळे एकदा मंगळवेढ्याला आले होते. तेव्हा त्यांनी नवं नवं लुगडं हे गाणं लंडनच्या हॉलमध्ये गायल्याचं सांगितलं. तसेच या गाण्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. या गाण्याच्या तुफान यशानंतर मंगळवेढेकर यांनी त्यांची जास्तीत जास्त गाणी नंतर आनंद शिंदेंनाच दिली. दोघांची मैत्री घट्ट झाली आणि ट्युनिंगही चांगलीच जमली होती. (साभार, आंबेडकरी कलावंत) (‘he nav nav lugad’ marathi song was also famous in london)
संबंधित बातम्या:
दादा कोंडके म्हणाले, ‘तुमची गाणी मला द्या, हवं तेवढं मानधन घ्या’; मग काय झालं?, वाचा!
‘पोपटा’पासून ते ‘आंटीची वाजवली घंटी’पर्यंतची हिट लोकगीतं कुणी लिहिलीय माहित्ये का?; एकदा वाचाच!
‘हॅलो, मी बाबुराव बोलतोय…’ हे गाणं विठ्ठल उमपांकडे कसं आलं?, आधी कुणी गायलं?; वाचा, मजेदार किस्सा!
(‘he nav nav lugad’ marathi song was also famous in london)