Kangana Ranaut | मुंबई हायकोर्टाची सुनावणी, कंगना-रंगोलीला पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा

कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांना मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिला आहे.

Kangana Ranaut | मुंबई हायकोर्टाची सुनावणी, कंगना-रंगोलीला पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 12:53 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री  कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांना मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिला आहे. राजद्रोह आणि धार्मिक न्हावना भडकावल्या प्रकरणी दोघींची अटक आणि पोलीस कारवाई 25 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. तसेच, कंगनाला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची गरज नाही, असे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. या आधी 8 जानेवारी रोजी कंगनाचा जबाब नोंदवण्यात आला होता (Hearing on Kangana Ranaut’s Petition at Mumbai high court).

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295A आणि 153A या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल आहे. या खटल्याची सुनावणी आज (11 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. 8 जानेवारीला कंगना रनौतने वांद्रे पोलीस स्टेशन गाठले होते आणि तिथे कंगनाने तिचा जवाब नोंदवला होता. मात्र, पोलीस पुन्हा एकदा कंगनाची चौकशी करतील, अशी शक्यता वर्वण्यात येत होती.

कंगनाची 3 तास चौकशी

या प्रकरणी अगोदरच्या सुनावणी दरम्यान, न्यायालयाने 8 जानेवारीपर्यंत कंगनाला अटक करू नये, असे म्हटले होते. मात्र, कंगनाने पोलिसांना सहकार्य करावे, असेही निर्देश कोर्टाकडून देण्यात आले होते. त्यानंतर कंगना 8 जानेवारीला वांद्रे पोलिस स्टेशनला पोहचली होती. तिथे सुमारे 3 तास कंगनाची चौकशी करण्यात आली. कंगनाच्या 100हून अधिक ट्विट्सवर पोलिसांचे लक्ष आहे. पोलिसांना या सर्व ट्विट्सची चौकशी करायची आहे. 8 जानेवारीला पोलिसांनी फक्त 4-5 ट्विटची चौकशी केली होती.

नेमकं प्रकरण काय?

कंगना रनौत हिने मध्यंतरी बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगना रनौत हिने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. पोलीस कंगना रनौत हिच्यावरोधात तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते (Hearing on Kangana Ranaut’s Petition at Mumbai high court).

‘अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते’, असेही याचिकेत सांगण्यात आले होते. यानंतर वांद्र न्यायालयाने कंगना रनौत हिच्यावरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

चित्रपट दिग्दर्शक मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. ‘अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते,’ असे या याचिकेत म्हटले होते.

‘कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केलं आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्वीट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाचं नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात,’ असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केला होता. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

(Hearing on Kangana Ranaut’s Petition at Mumbai high court)

हेही वाचा :

Kangana Ranaut | कंगना रनौत कोर्टाच्या आदेशाच आज तरी पालन करणार का?

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.