Video: अभिनेत्रीने मुलीलाच केले लिप किस, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी संतापले
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने मुलीलाच लिप किस केले आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटात दिसलेली तिची सहकलाकार इस्रायली अभिनेत्री गॅल गॅडोट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्रीने नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. या अभिनेत्रीने लेकीला लिप किस केल्यामुळे ही चर्चा सुरु आहे.
अभिनेत्री गॅल गॅडोटला मंगळवारी लॉस एंजेलिसमध्ये हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये सन्मानित करण्यात आले. हा तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तिचा फास्ट अँड फ्युरियस सह-अभिनेता विन डिझेल, तिचा नवरा जारोन वारसानो आणि तिच्या चार मुली असे तिचे संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होते. हॉलिवूड इंडस्ट्रीत मोठं स्थान मिळवलेल्या गॅल गॅडोटच्या कामगिरीचा आनंद साजरा करण्यात आला. पण या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओपाहून नेटकऱ्यांनी गॅल गॅडोटला प्रचंड ट्रोल केले जात आहे.




वाचा: मेगास्टार महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?
काय आहे व्हायरल व्हिडीओ?
पीपल मॅगझिनने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गॅल गॅडोट आणि तिची धाकटी मुलगी डॅनिएला यांच्यातील आनंदाचा क्षण कैद झाला आहे. या क्लिपमध्ये, अभिनेत्री तिच्या चार वर्षांच्या मुलीला प्रेमाने लिप किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी याला एक गोंडस आई-मुलीचा क्षण म्हटले आहे तर काहींनी यावर आक्षेप घेतला आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच काही लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘हार्ट ऑफ स्टोन’ फेम अभिनेत्रीला ट्रोल करत एका यूजरने लिहिले की, ‘लोक काय म्हणतील याची पर्वा नाही. तुमच्या मुलाचे ओठांचे चुंबन घेणे अजिबात सामान्य नाही.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हे योग्य नाही.’ अभिनेत्रीला ट्रोल करत आणखी एका यूजरने लिहिले की, ‘तुमच्या मुलाला लिप किस करणे योग्य नाही.’