Esha Deol Divorce | ईशाच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हेमामालिनी यांनी उचललं मोठं पाऊल ! थेट पोहोचल्या..
देओल कुटुंबात सध्या तणावाचं वातावरण आहे. अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांची मोठी लेक ईशा देओल हिच्या खासगी आयुष्यात वादल उठलं आहे. ईशा देओलचा संसार मोडला असून ती आणि भरत तख्तानी दोघे वेगळे होत आहेत. लग्नाच्या 11 वर्षांनंतर ईशाने पती भरत तख्तानीपासून वेगळं होत असल्याचा निर्णया जाहीर केला.
मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : देओल कुटुंबात सध्या तणावाचं वातावरण आहे. अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांची मोठी लेक ईशा देओल हिच्या खासगी आयुष्यात वादल उठलं आहे. ईशा देओलचा संसार मोडला असून ती आणि भरत तख्तानी दोघे वेगळे होत आहेत. लग्नाच्या 11 वर्षांनंतर ईशाने पती भरत तख्तानीपासून वेगळं होत असल्याचा निर्णया जाहीर केला. या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला असला तरी त्या दोघांमध्येही काही आलबेल नसल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. अखेर ईशा-भरतने वेगळं होत असल्याची अधिकृत घोषणा केली. घटस्फोटाच्या या निर्णयात हेमा मालिनी या मुलीच्या बाजूने आहेत, असंही समजतंय. मुलीच्या कोणत्याच निर्णयात त्या हस्तक्षेप करणार नाहीत, असं जवळच्या व्यक्तीने सांगितलं. मात्र असलं तरी मुलीचा संसार तुटत असल्याचं पाहून कोणत्याही आईल दु:खच होईल.
ईशाच्या घटस्फोटाच्या बातम्यांची सध्या सर्वत्र चर्चा असताना हेमामालिनी यांनी एक मोठ पाऊल उचललं आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटोही व्हायरल होत आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरूवात केली आहे.
अयोध्येत पोहोचल्या हेमामालिनी
ईशाच्या विभक्त होण्याची चर्चा सुरू असतानाच हेमामालिनी थेट अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी पोहोचल्या. लेकीच्या आयुष्यातील वादळामुळे हेमामालिनी यांनी मन:शांतीसाठी अध्यात्माचा मार्ग निवडला आहे, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. हेमामालिनी यांनी मंदिरात पूजा केली आणि नंतर मीडियाशीही बातचीत केली. मंदिराती व्यवस्था, सुविधांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
ईशा देओलच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्र दु:खी
ईशा आणि भरतच्या घटस्फोटामुळे तिच्या वडिलांना धर्मेंद्र यांना मोठा धक्का बसला असून ते खूप दु:खी आहेत. ईशाने तिच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचार करावा, असं त्यांचं मत होतं अशी माहिती समोर आली आहे. भरतपासून विभक्त होण्याच्या ईशाच्या निर्णयाच्या ते विरोधात नव्हते. मात्र तिने पुन्हा एकदा त्यावर विचार करावा, असं धर्मेंद्र यांचं मत होतं असं एखा जवळच्या व्यक्तीने सांगितलं. आई-वडील विभक्त झाल्याने मुलांवर परिणाम होतो. त्यामुळे मुलांसाठी पुनर्विचार करावा , असं त्यांचं म्हणणं होतं.