मुंबई | अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा १६ जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला आहे.. सिनेमाच्या माध्यमातून तीन तासात रामायण मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. एवढंच नाही तर, सिनेमा गृहात एक सीट हनुमान यांच्यासाठी ठेवण्यात आली आहे. सिनेमाला सर्वच स्तरातून समिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. सर्वप्रथम सिनेमाला नेपाळ येथून विरोध करण्यात आला. सिनेमाच्या एक डायलॉगवर (सीता भारत की बेटी है…) अपत्ती दर्शवण्यात आली आहे.. तर दुसरीकडे, आता हिंदू सेनेने दिल्ली उच्च न्यायालयाल जनहित याचिका दाखल केली असून सिनेमा प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी केली.
हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी शुक्रवारी जनहित याचिका दाखल केली आहे. गुप्ता यांनी याचिकेमध्ये रामायण, राम आणि देशाच्या संस्कृतीची खिल्ली उडवल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर, सिनेमात दाखवण्यात आलेल्या रावण, राम, सीता आणि हनुमानाची अनेक अपमानास्पद दृश्ये हटवण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे..
सिनेमात भूमिका चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं याचिकेत लिहिलं आहे. या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशीही संपर्क साधण्यात आला, मात्र त्यांच्याकडून आजपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे…
सिनेमाला विरोध होत आहे, पण बॉक्स ऑफिसवर मात्र सिनेमा मोठी कमाई करताना दिसत आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.. तर इतर भाषांमध्ये देखील सिनेमाने जवळपास ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूणच, प्रभास आणि क्रिती सनॉनच्या सिनेमाने केवळ भारतात १२० ते १४० कोटींची कमाई केली आहे.
सिनेमा देशभरात तब्बल ६ हजार २०० पेक्षा अधिक स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये ४ हजारांपेक्षा जास्त स्क्रिनवर सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.. कोरोना महामारीनंतर आदिपुरुषचे नाव सर्वात मोठी ओपनिंग करणाऱ्या सिनेमांमध्ये सामील झालं आहे. आदिपुरुष हा पठाणनंतर हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.