जेव्हा आमच्या एका नायकाला परदेशी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ‘अभिनेत्रीचा’चा पुरस्कार मिळाला होता..!

निर्मल पांडे या अभिनेत्याच्या नावावर एक विक्रम नोंदविला गेला आहे, तो विक्रम अजूनपर्यंत बॉलीवूडमध्ये कुणीच तोडू शकले नाही. 2007 मध्ये त्याचा दायरा नावाच्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याच्या भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

जेव्हा आमच्या एका नायकाला परदेशी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट 'अभिनेत्रीचा'चा पुरस्कार मिळाला होता..!
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 11:42 AM

मुंबईः निर्मल पांडे या अभिनेत्याला ज्या पिढीने त्यांचा अभिनय पाहिला आहे ते त्यांना कधीच विसरू शकत नाहीत. खरं तर निर्मल पांडे याला नको त्या वेळेला मरणाने गाठले आहे. निर्मल पांडे (Nirmal pandey) यांनी बँडिट क्वीन, (Bandit Queen), ट्रेन टू पाकिस्तान, इस रात की सुबह नहीं आणि दायरा (Dayra) या धीरगंभीर चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. इस रात की सुबह नही यासारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट वेगळ्या पातळीवर ठेवला होता. त्या चित्रपटाची एक खासियत ही आहे एक त्याकाळात बनलेला इस रात की सुबह नही हा चित्रपट समकाळलालाही लागू होणारा आहे.

निर्मल पांडे या अभिनेत्याच्या नावावर एक विक्रम नोंदविला गेला आहे, तो विक्रम अजूनपर्यंत बॉलीवूडमध्ये कुणीच तोडू शकले नाही. 2007 मध्ये त्याचा दायरा नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. तो चित्रपट व्हेनोसिएन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवडला गेला आणि त्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार त्याला मिळाला होता. सर्वश्रेष्ठ नायिकेचा पुरस्कार चाची 420 मध्ये कमल हसनलाही मिळाला नव्हता. मात्र महिलांच्या संघर्षाशील जीवनावर निर्माण झालेला अमोल पालेकर यांचा संवेदनशील आणि धीरगंभीर दायरा (1997) या चित्रपटात पुरूष कलाकार असूनही बाई बनून त्यांचं दुःख पडद्यावर दाखवून ते निर्मल पांडे या अभिनेत्यानच जिवंत केले. विदेशात त्याच्या अभिनयाचे कौतूक तर झालेच पण भारतातसुद्धा त्याच्या अभिनयाची वाहवा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर दायरा या चित्रपटाची खूप वाहवा करण्यात आली, म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्मल पांडे या अभिनेत्याला गौरवण्यात आले, मात्र त्याच भूमिकेसाठी भारतात मात्र त्याला नाकारण्यात आले.

इस रात की सुबह नहीं गौरवलेला सिनेमा

निर्मल पांडे यांनी मोठ्या पडद्यापासून टेलिव्हिजनवर त्यांनी काम केले होते. खलनायक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. तेलुगूमधील केडी मधील त्याची भूमिका ही खलनायकाचीच होती. त्यावेळीही त्याचे कौतूक झाले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली येथून त्याने पदवी घेतली होती. दिल्लीत असतानाच त्याच्या इस रात की सुबह नहीं या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर त्याने प्यार किया तो डरना क्या, वन टू का फोर आणि शिकारी या चित्रपटातून त्यांनी काम केले.

नाटकासाठी दिल्ली ते लंडन प्रवास

राष्ट्रीय नाट्य विश्वविद्यालयमधून त्याने अभिनयाचे धडे घेतल्यानंतर तो काही काळ लंडनमधील तारा नावाच्या थिएटर ग्रुपकडे सामील झाला. आणि त्यांच्याद्वारेच मग त्याने 125 नाटकातून त्याने काम केले. त्यातील दीर्घकाळ चाललेली नाटक होती हिर रांझा आणि अ‍ॅन्टीगॉन. त्यावेळी एका मुलाखतीत तो सांगतो की, माझ्या आयुष्यातील ही 125 नाटकं म्हणजे माझ्या अभिनय कारकीर्दीतील सुवर्णकाळ होता. या काळातच इग्लंडमध्ये त्याचा अभिनय शेखर कपूर यांनी बघितला आणि त्याला बँडिट क्वीन या चित्रपटात संधी दिली. बँडिट क्वीन चित्रपटात त्याने जिच्या आयुष्यावर तो चित्रपट बेतलेला आहे, त्या फुलन देवीच्या प्रियकराची व्यक्तिरेखा त्याने केली होती. नंतर या चित्रपटाने सेन्सॉर बोर्डच्या जाचक अटीमुळे खूप वादग्रस्त ठरला. पण निर्मल पांडे मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कलाकार ठरला. त्यानंतर निर्मलने मागे वळून बघितले नाही. निर्मलला त्यानंतर सलग चित्रपटांच्या ऑफर त्याला येत गेल्या आणि बहुतांशी चित्रपट त्याचे हिट ठरले. त्यातील त्याचे उल्लेखनीय भूमिका असलेले चित्रपट म्हणजे बँडिट क्वीन, शिकारी, ट्रेन टू पाकिस्तान, औजार, इस रात की सुबह नही, दायरा, हम तुम पे मरते है, प्यार किया तो डरना क्या, जहां तुम ले चलो.

निर्मल पांडे यांनी 1997 मध्ये 2005 मध्ये त्यान मार डाला हा अल्बम काढला होता. या काळात त्याने दोन लग्न केली 1997 मध्ये लखनऊमध्ये त्याने कौसर रजा हिच्याबरोबर लग्न केले तर 2005 मध्ये अर्चना शर्मा बरोबर लग्न केले. त्याला अर्चनापासून दोन मुले आहेत.

निर्मलची चित्रपट कारकीर्द

लाहोर, केडी (तेलगू), देशद्रोही, राजकुमार आर्यन, डकैत, लैला, हातिम टीव्ही सिरियल, आँच, दिवानगी, वन टू का फोर, शिकारी, दुबई, हद कर दी आप ने, हम तुम पे मरते है, गॉडमदर, जहाँ तुम चलो, प्यार किया तो डरना क्या, ट्रेन टू पाकिस्तान, औझार, दायरा, इस रात को सुबह नही, बँडिट क्वीन.

अशा या विविधारंगी भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला अवघे 47 वर्षाचे आयुष्य लाभले. त्याचा मृत्यू 18 फेब्रुवारी 2010 मध्ये मुंबईत झाला.

संबंधित बातम्या

कोटींचा घोटाळा केलेल्या मुलीच्या जीवनावर कथा बनवण्यासाठी नेटफ्लिक्‍स ने दिले लाखो डॉलरची ऑफर!

Farhan-Shibani Wedding : महाराष्ट्रीय रिवाजानुसार लगीनगाठ बांधणार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर

Tv9 Public Poll: प्रत्येक वेळेस बाईनच घर का सोडावं? अरूंधती जोगळेकरनं देशमुखांचं घर सोडावं? जनतेचाच कौल वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.