Bhau Kadam : भाऊ कदमने स्ट्रगल काळात कसा केला ट्रोलिंगशी सामना? शांताबाई केल्यानंतर काही महिला…
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील मराठी घराघरांत पोहोचला. हा कार्यक्रम सध्या संपला असला तरी त्यातील कलाकारांचे आजही खूप कौतुक होत आहे. याच शोमधून भाऊ कदमचं नाव घराघरांत पोहोचलं. त्याच्या नुसत्या एंट्रीने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं. हाच भाऊ कदम आता सध्या एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे
‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील मराठी घराघरांत पोहोचला. निलेश साबळे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम यांसह असंख्य गुणी कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा कार्यक्रमा घराघरांत आवडीने बघितला जायचाय. हा कार्यक्रम सध्या संपला असला तरी त्यातील कलाकारांचे आजही खूप कौतुक होत आहे. याच शोमधून भाऊ कदमचं नाव घराघरांत पोहोचलं. त्याच्या नुसत्या एंट्रीने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं. हाच भाऊ कदम आता सध्या एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. ‘सिरीयल किलर’ हे भाऊ कदम याचं नाटक सध्या खूप गाजत असून त्यामधून तो एका वेगळ्या स्वरूपात दिसणार आहे. मुळात ब्लॅक कॉमेडी असलेल्या या नाटकात भाऊ कदमची भूमिका काय, या नाटकाकडे कसा वळला असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाऊ कदमने अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. सिरीयल किलर नाटकात काय धमाल आहे, टीका करणाऱ्यांमुळे फायदा कसा झाला? भाऊ trollers ना कसं उत्तर देतो? त्याकडे कसं पाहते, या सर्व प्रश्नांची त्याने मनमोकळपेणे उत्तर दिली.
ट्रोलर्सकडे कसं पाहतो भाऊ कदम ?
घराघरांत नाव पोहोचलेल्या भाऊ कदम याला प्रेक्षकांचं अपार प्रेम, आदर मिळाला. पण काही वेळी टीकेचाही सामना करावा लागला. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशी एक म्हण आहे. पण सध्या टीकाकारांपेक्षा ट्रोल करणारेच जास्त दिसता, सोशल मीडियामुळे तर लोकं सहज त्यांना काय वाटत, चांगल्या-वाईट प्रतिक्रिया स्पष्टपणे देतात. भाऊ कदम याचं दिसणं,रंगावरूनही बोलणारे अनेक लोक आहेत. चला हवा येऊ द्या मध्ये भाऊने स्त्री वेषातील अनेक पात्रं साकारली, त्यावरूनही अनेकांनी त्याच्यावर टीका केली. तिकडे भाऊ कदम किती लक्ष देतो, ट्रोलर्सकडे तो कसा पाहतो ? असा प्रश्न त्याला मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावरही त्याने मनमोकळेपणे पण तितकंच स्पष्ट उत्तर दिलं.
‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मी करत होतो, तेव्हा सुरूवातीला मला जेव्हा कळलं की त्यातल्या भूमिकेबद्दल लोकं काहीबाही बोलत आहेत. तेव्हा मला वाटायचं की हे वाईट वाटतंय तर आपण का दाखवतोय ? असा प्रश्न मला पडायचा. पण तेव्हा निलेश मला सांगायचा की विरोधात बोलणारे पक्त काहीच लोकं आहेत. पण ज्येनुअनली हा कार्यक्रम पाहणारे जे लोक आहेत, ते तर काही बोलत नाहीयेत ना.
किंबहुना मी एखाद्या कार्यक्रमाला जायचो, तेव्हा तिथे महिलाही उपस्थित असायच्या. त्या जेव्हा भेटायला यायच्या तेव्हा आवर्जून सांगयच्या तुम्ही छान करताय शांताबाई.. काही चुकीचं असतं तर त्या मला तेव्हाच बोलल्या असत्या ना, तुम्ही ते करू नका.
मी जिथे राहतो तिथे कुठे खाली गेलो, बाजारात गेलो, तर आजूबाजूचे लोक येऊन बोलतात, पण ते कधी असं काही बोलले नाहीत. कधी चांगला एपिसोड झाला तरी आणि कधी तेवढा बरा नाही झाला तरी तेही आवर्जून सांगायचे. नंतर नंतर मी मोबाईल पाहणं बंद केलं, कोण काय बोलंतय, काय रिॲक्ट करत आहेत, ते मला काहीच माहीत नसायचं. त्यामुळे डोक्याला शांतता होती, असं भाऊ कदमने सांगितलं. त्यांच्याकडे ( ट्रोलर्स) लक्षच द्यायचं नाही,आपण आपलं काम करायचं, जे बघणारे आहेत, त्यांच्यासाठी तरी करू असा विचार करून मी काम करतो, असंही त्याने नमूद केलं.