किती सुंदर! तुम्हाला माहितीये प्राजक्ताच्या ब्रँडचे दागिने कसे बनतात? व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटेल
सध्या प्राजक्ता माळीच्या 'प्राजक्तराज' या ब्रँडची चर्चा आणि त्यासंबधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्राजक्ताच्या 'प्राजक्तराज' ब्रँडचे दागिने नेमके कसे बनतात ते या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. कधी फोटोज् तर कधी हास्यजत्रेतील तिचे काही किस्से, तिच्या मुलाखती, चित्रपट अशा अनेक कारणांमुळे ती नेहमी चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता तिच्या पत्रकार परिषदेवरून चर्चेत आहे. त्यामुळे प्राजक्ता माळीच्या अनेक गोष्टींबद्दल इंटरनेटवर सर्च केलं जात आहे. प्राजक्ताची संपत्ती किती? तिचं फार्म हाऊस कुठे , तिचा बॉयफ्रेंड कोण आहे वगैरेबद्दल लोक सर्च करताना दिसत आहेत.
‘प्राजक्तराज’ दागिन्यांच्या ब्रँडबद्दलही चर्चा
अनेकांनी प्राजक्ताच्या ‘प्राजक्तराज’ या दागिन्यांच्या ब्रँडबद्दलही सर्च केलं आहे. तसेच तिच्या ब्रॅंडच्या दागिन्यांची किंमत काय आहे वैगरे अशा अनेक गोष्टी सर्च करण्यात येत आहे. यातच आता प्राजक्ताने शेअर केलेला एक जुना व्हिडीओ देखील चर्चेत आहे. हा व्हिडीओ आहे ‘प्राजक्तराज’ या ब्रँडचे दागिने नेमके कसे बनवले जातात याबद्दल.
आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच तिच्या अनेक व्यवसायांनी आपली एक वेगळी छबी निर्माण केली आहे. प्राजक्ताचा ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांचा ब्रँड आहे.
View this post on Instagram
;
मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती
अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या डिझाईन कशा असतात आणि प्रत्यक्ष ते दागिने कसे घडतात, याची झलक तिने चाहत्यांना दाखवली आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कारागीरांचं हस्तकौशल्य कौतुकास्पद
व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे प्रत्येक दागिन्यांचे साचे तुम्हाला पाहायला मिळत असतील. या प्रत्येक साच्यात बऱ्याच प्रकारच्या दागिन्यांच्या नक्षी दिसतात. शिवाय त्या दागिन्यांना ज्या पद्धतीने घडवलं जातं. ते अतिशय सुंदर पद्धतीने तो दागिना जन्माला येतो. दरम्यान “प्राजक्तराज” चे अलंकार बनवणाऱ्या कारागीरांचं हस्तकौशल्य वाखाण्याजोगं आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओवर “असे घडतात “प्राजक्तराज” चे अलंकार, कारागीरांचं हस्तकौशल्य. इथला प्रत्येक अलंकार आहे, पारंपरिक, मराठी आणि हस्तकौशल्यानं बनवलेले अलंकार ; हीच आहे आमची खासियत” असं कॅप्शनही दिलं आहे. तसेच नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओ कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला.