बॉलीवूड स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचे पगार असतात लाखोंच्या घरात? आलिया भट्टच्या बॉडीगार्डने थेट सांगितले आकडे
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सचे पगार सोशल मीडियावरील लाखोंच्या आकड्यांनी चर्चेचा विषय बनले आहेत. आलिया भट्टच्या बॉडीगार्डने थेट आकडेच जाहीर केले आहेत. पगाराचा आकडा सेलिब्रिटीसोबत काम केलेल्या काळावर आणि पगारवाढीवर अवलंबून असतो. असंही त्यांनी सांगितलं. खरंच सेलिब्रिटी बॉडीगार्ड्सचे पगार हे लाखोंच्या रक्कमेत असतात का?
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या चित्रपटंप्रमाणेच त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहते फार उत्सुक असतात. मग ती सेलिब्रिटींची प्रॉपर्टी असो, त्यांच्या वस्तूंचे ब्रॅंड असो अगदी त्यांच्या अफेअर्सपासून ते त्यांच्या घटस्फोटापर्यंत सर्वच अपडेट जाणून घेण्यासाठी नेहमीच सर्व उत्सुक असतात. पण यामध्येही सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे या स्टार्सच्या बॉडीगार्ड्स आणि त्यांचा पगार.
अनेकांना हा प्रश्न अगदी सोशल मीडियावर देखील विचारला आहे, या सेलिब्रिटींसोबत जे बॉडीगार्ड असतात त्यांचे पगार किती असतील? याबाबत अनेकांनी उत्सुकतेने असे प्रश्न विचारले आहे. काही सेलिब्रिटींचे बॉडीगार्ड प्रसिद्ध देखील आहेत.
स्टार्सच्या बॉडीगार्ड्सना किती पगार मिळतो?
जसं की, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा त्याच्या सावलीसारखा त्याच्यासोबत असतो आणि तोसुद्धा एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीये. याचप्रमाणे अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा व इतर अनेक सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सना पाहिलं असेलच.
या मोठ्या स्टार्सच्या बॉडीगार्ड्सना किती पगार मिळतो, याबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता असते. अनेकदा त्यांना कोट्यवधी रुपये पगार असल्याची चर्चा होते; पण तसं खरंच आहे का, याचा खुलासा आलिया भट्ट, वरुण धवन आणि अनन्या पांडे यांच्यासह अनेक ए-लिस्टर्सना सुरक्षा पुरवणाऱ्या युसूफ इब्राहिमने केला आहे.
स्टार्संना ए-लिस्टर्सना सुरक्षा पुरवणाऱ्या युसूफ यांनी काय सांगितलं?
युसूफच्या मते, बऱ्याच बॉडीगार्ड्सना ते ज्यांच्यासाठी काम करतात, त्या कलाकारांबरोबरच ते काम करत असलेल्या चित्रपटाचे निर्माते आणि कार्यक्रमाचे आयोजकही पैसे देतात. अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांसारख्या टॉप स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचीही हीच स्थिती आहे.
या बॉडीगार्ड्सच्या पगाराचा विचार केल्यास जेवढी सोशल मीडियावर चर्चा होते, तेवढा तो पगाराचा आकडा नक्कीच नाही. युसूफ म्हणाले की, “तुम्हाला त्यांचा पगार किती असेल असं वाटतं? त्यांचा पगार कदाचित 25 हजार ते एक लाख रुपये असू शकतो,” असं युसूफने एका मुलाखतीत सांगितलं.
“कोणीही बॉडीगार्ड्सना जास्त पैसे देत नाही”
पुढे युसूफ म्हणाले, “तसेच तुम्हाला किती पगारवाढ मिळते यावरही ते अवलंबून असतं. बॉडीगार्ड्सना महिन्याला पगार मिळतो, ते रोजंदारीवर नसतात. कोणीही बॉडीगार्ड्सना जास्त पैसे देत नाही. उद्या जर मी म्हटलं की मला दररोज 1 लाख रुपये पगार मिळतो, तर ते अजिबात खरं नाही. खरं तर एवढा पगार मला कोणीही देणार नाही, कारण हे काम करण्यासाठी आणखी बरेच जण आहेत.”
कोणत्या गोष्टींच्या आधारे पगाराचा आकडा ठरला जातो?
सेलिब्रिटी बॉडीगार्ड्सचे नेमके पगार किती असतात, याबाबत विचारल्यावर युसूफ म्हणाले, “मी सांगू शकत नाही. पण तुम्ही किती काळ संबंधित स्टारबरोबर काम करत आहात, इतक्या वर्षात तुमची किती पगारवाढ झाली आहे यावर तो आकडा अवलंबून असतो, पण सोशल मीडियावर जे आकडे सांगितले जातात ते आकडे खोटे आहेत.”
युसूफने सांगितलं की स्टार्स त्यांच्या बॉडीगार्ड्सच्या आरोग्याची देखील काळजी घेतात. “एक स्टार तुम्हाला पगार म्हणून चांगली रक्कम देतो, ज्यामुळे तुम्ही तुमचे घर आरामात चालवू शकता. ते त्यांच्या मुलांच्या शाळेची फी, त्यांच्या वैद्यकीय खर्चाची काळजी घेतात. निदान मी ज्या लोकांबरोबर काम केलं आहे, ते आम्हाला वैद्यकीय मदतीची तसेच आमच्या मुलांची फी भरायची गरज असेल तेव्हा कळवायला सांगतात,”
सोशल मीडियावर पगाराबाबत अनेक अफवा
अशा पद्धतीने युसूफ यांनी सोशल मीडिया आणि खऱ्या आयुष्यातील सेलिब्रिटी बॉडीगार्ड्सचे पगाराचे आकडे सांगून खुलासा केला आहे. तसेच सोशल मीडियावर सांगितलेल्या कोणत्याही आकड्यांवर विश्वास ठेवू नका असही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.