Hrithik Roshan: हृतिक रोशनच्या विक्रम वेधमधील ‘अलखोलिया’ गाणे रिलीज
हृतिक रोशनचा शेवटचा चित्रपट तीन वर्षांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 'वॉर' चित्रपटातील हृतिक आणि टायगर श्रॉफची केमिस्ट्री आणि अॅक्शन लोकांना खूप आवडले. कोरोनामुळे 'वॉर' नंतर हृतिकचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही.
बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan)विक्रम वेधा या चित्रपटातून थिएटरमध्ये पुनरागमन करत आहे. हृतिक या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. या मनोरंजक (entertainment) सस्पेन्स थ्रिलर असलेल्या चित्रपटात हृतिक रोशनसोबत सैफ अली खान (Saif ali khan )देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आज विक्रम वेधाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. हृतिक रोशनच्या ‘अलखोलिया’ या जबरदस्त म्युझिक व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. हृतिकचा डान्स(Dance) खूप आवडतो.
हृतिकचा डान्स गाण्याचे प्रमुख आकर्षण
गाण्यात हृतिक नशा करताना दिसत आहे. गाण्यासोबतच हृतिकचा धमाकेदार डान्स हे या गाण्याचे प्रमुख आकर्षण आहे. हे गाणे विशाल-शेखर या संगीतकार जोडीने गायला आहे. विक्रम वेध हे तमिळ चित्रपटाचे रूपांतर आहे. पुष्कर गायत्री दिग्दर्शित हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात हृतिक रोशनला प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले होते. विक्रम वेध या चित्रपटातील आज रिलीज झालेले ‘अल्कोहोलिया’ हे गाणे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहे. विशाल-शेखरसोबत अनन्या चक्रवर्तीनेही या गाण्याला आवाज दिला आहे. हृतिकनेही हे गाणे त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर शेअर केले आहे. हे गाणे शेअर करताना हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आज हवामान अलखोलिया झाले आहे.
तीन वर्षांनंतर परतला
हृतिक रोशनचा शेवटचा चित्रपट तीन वर्षांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘वॉर’ चित्रपटातील हृतिक आणि टायगर श्रॉफची केमिस्ट्री आणि अॅक्शन लोकांना खूप आवडले. कोरोनामुळे ‘वॉर’ नंतर हृतिकचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळेच त्याचे चाहते विक्रम वेधला प्रचंड उत्सुक आहेत. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवू शकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.