बॉयफ्रेंड असावा तर असा.. हृतिकच्या हातात गर्लफ्रेंडच्या सँडल्स पाहून फॅन्स म्हणाले Such a Darling !
Hrithik Roshan Holding Saba Azad Heels : हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत नुकतीच नीता अंबानीच्या पार्टीत हजेरी लावली होती
मुंबई : ग्रीक गॉड म्हणून फेमस असलेला बॉलिवूडचा देखणा अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) नुकतेच ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या ग्रँड ओपनिंगला (NMACC) हजर होत. या दोघांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र त्यापैकी एक फोटो सर्वात प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो पार्टीतला असून त्याबद्दल प्रचंड चर्चा सुरू आहे. हा काही एखादा हॉट किंवा रोमॅंटिक फोटो नाही पण तरीही त्याची खूप चर्चा आहे. ही चर्चा तर होणारच !
कारण या फोटोमध्ये हृतिक रोशनच्या हातात त्याची गर्लफ्रेंड सबा आझादचे सँडल्स दिसत आहेत. हृतिकचा हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत. पण त्याच्या चाहत्यांना विशेषत: मुलींना त्याचा हा अनोख अंदाज खूपच आवडला आहे.
हृतिकने पकडल्या सबाच्या हील्स
NMACCच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये काळ्या ड्रेसमध्ये आलेला हृतिक खूप देखणा दिसत होता. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आलेल्या सबा आझादसोबत हृतिकचे फोटो खूप व्हायरल झाले. आता या इव्हेंटमधील काही इनसाइड फोटोही समोर आले असून तेही व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये हृतिक रोशनच्या हातात सँडल्स दिसत आहेत. एका व्यक्तीशी गप्पा मारताना हृतिकने अतिशय कॅज्युइली या चपला पकडल्या आहेत. हे पाहून त्याचे फॅन्स अवाक् आणि फिदा दोन्ही झाले आहे.
View this post on Instagram
मुलींना आलं भरून
हृतिक रोशनचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे आणि विशेषत: मुलींमध्ये हा फोटो व्हायरल होत असून अनेक मुलींचे म्हणणे आहे की त्यांनाही हृतिक रोशनसारखा बॉयफ्रेंड हवा आहे. एका मुलीने लिहिले आहे की, ‘ऋतिक रोशन उत्तम बॉयफ्रेंड आहे. चांगल्या दिसण्यासोबतच मुलीला स्पेशल कसे फील कसे वाटू द्यावे, वाटावे हे कोणीतरी त्याच्याकडून शिकले पाहिजे. तर दुसऱ्या मुलीने लिहिले आहे की, ‘असा मुलगा मला कधी मिळेल, जो हातात चप्पल घेऊन फिरेल. Hrithik Roshan is such a darling.’ अशी प्रतिक्रियाही तिने दिली आहे. एवढंच नव्हे तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘दीवाना हो तो ऐसा. मलाही तेच हवे आहे’.
View this post on Instagram
लग्नाच्या चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, हृतिक आणि सबा या वर्षी लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाशी संबंधित अनेक बातम्या येऊ लागल्या. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी मात्र लग्नाशी संबंधित कोणत्याही बातम्यांचे खंडन केले होते.