बलात्काराचा सीन शूट करताना अभिनेत्रीचा उडाला थरकाप; ‘तो’ क्षण आठवत म्हणाली…

| Updated on: Dec 30, 2022 | 3:23 PM

'घरी गेल्यानंतर ...', बलात्काराचा सीन शूट झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

बलात्काराचा सीन शूट करताना अभिनेत्रीचा उडाला थरकाप; तो क्षण आठवत म्हणाली...
बलात्काराचा सीन शूट करताना अभिनेत्रीचा उडाला थरकाप; 'तो' क्षण आठवत म्हणाली...
Follow us on

Huma Qureshi On Badlapur : अभिनेत्री हुमा कुरैशीने (Huma Qureshi)अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘बदलापूर’ चित्रपटात हुमाने साकारलेली भूमिका आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. चित्रपटात हुमासोबत अभिनेता वरुण धवण आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आले. चित्रपटात हुमाने सेक्स वर्करची भूमिका बजावली होती. आता अभिनेत्रीने चित्रपटात बलात्काराचा सीन शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

बलात्काराचा सीन शूट केल्यानंतर अभिनेत्रीला मोठा धक्का बसला होता. सोबत हुमाने सेक्स वर्करची भूमिका साकारण्यासा का होकार दिला. यामागचं कारण देखील सांगितलं. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने मोठा खुलासा केला. ‘मी सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. आपण अगदी सहजपणे एखाद्या महिलेला जज करतो. पण सेक्स वर्करचं काम करणारी देखील एक महिला आहे. त्या भूमिकेत मला काही गोष्टी प्रचंड आवडल्या, पण रेप सीन शूट करताना मला वाईट वाटत होतं.’

 

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘श्रीराम राघवन आणि वरुण धवन यांच्यासोबत मला सुरक्षित वाटत होतं. मला आठवत आहे, मी माझ्या खोलीत परतत होती. मी पूर्ण दिवस कपडे घालून असायची. पण ते सर्वकाही बनावट होतं. घरी गेल्यानंतर मला प्रचंड राग यायचा. माझा थरकाप उडाला होता. तुम्ही यासर्व गोष्टींची कल्पना दुसऱ्या व्यक्तींसोबत करू शकत नाही. तेव्हा मला प्रचंड राग आला होता, पण मी स्वतःला शांत केलं. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

हुमा कुरैशीच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री मोनिका ओह माय डार्लिंग’ चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. चित्रपटात अभिनेत्रीने राजकुमार राव आणि सिकंदर खेरसोबत एकत्र स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटातील अभिनय देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला.