मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे हुमा कुरेशी हिला 2012 मध्ये अनुराग कश्यप यांनीच लाॅन्च केले आहे. हुमा कुरेशी आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांची केमिस्ट्री सर्वांनाच माहितीये. काही दिवसांपूर्वीच हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा डबल एक्सएल हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) या दिसल्या होत्या. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काही विशेष धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या.
विशेष म्हणजे डबल एक्सएल या चित्रपटासाठी हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांनी 18 ते 20 किलो वजन वाढवले होते. सुरूवातीला या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. यादरम्यान जान्हवी कपूर हिचा देखील चित्रपट फ्लाॅप गेला होता.
नुकताच हुमा कुरेशी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही धक्कादायक खुलासे करताना हुमा कुरेशी ही दिसली आहे. हुमा कुरेशी म्हणाली की, डबल एक्सएल चित्रपटासाठी मी वजन वाढवले होते. मात्र, त्यानंतर मला काही चित्रपटांमध्ये नाकारले गेले. कारण त्याचे एकच होते ते म्हणजे माझे वाढलेले वजन
पुढे हुमा कुरेशी म्हणाली की, करिअरच्या सुरूवातीला मला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. लोक सतत माझ्या शरीरावर टिका करत होते. सुरूवातीच्या काळात लोक मला सतत वजन कमी करण्याचा सल्ला देत होते. लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्यासही अनेकांनी मला सांगितले होते. हुमा पुढे म्हणाली की, एका चित्रपट समीक्षकाने मला थेट म्हटले होते की, हुमा सुंदर चेहऱ्याची अभिनेत्री नक्कीच आहे पण मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी तुला 5 किलो वजन हे कमी करावेच लागणार आहे.
हुमा कुरेशी पुढे म्हणाली की, मला त्या समीक्षकाचे बोलणे ऐकून खूप जास्त दु:ख हे नक्कीच झाले होते. इतकेच नाही तर मी ढसाढसा रडायला देखील लागले होते. या मुलाखतीमध्ये हुमा कुरेशी ही काही गोष्टींवर बिनधास्त बोलताना देखील दिसली आहे. गॅंग्स ऑफ वासेपुर या चित्रपटासाठी आपल्याला फक्त 75 हजार फिस देण्यात आल्याचे देखील हुमा कुरेशी हिने म्हटले आहे.