हुमा कुरेशी आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लाईमलाइटमध्ये असते. सध्या हुमा तिची वेब सीरिज महारानीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान ती फंकी ड्रेस ते हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसतेय.
नुकतंच ती निळ्या रंगाच्या कफतान स्टाईलच्या ड्रेसमध्ये दिसली. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
या आउटफिटमध्ये स्लीव्हज पफ लूकमध्ये डिझाइन करण्यात आला आहे. तर वरच्या भागाला प्लगिंग नेकलाइनसोबत कफतान लुक देण्यात आला आहे.
या ड्रेसवरील तिच्या मेकअपनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिनं डोळ्यांना सुंदर लूक देणारं ब्लू लायनर, न्यूड लिपस्टिक, ब्लश आणि हायलाईटर वापरलं आहे.
हुमानं कॅरी केलेला हा डिझायनर ड्रेस निकिता म्हैसाळकरनं डिझाइन केला आहे. या ड्रेसची किंमत 22,500 रुपये आहे.