Kangana Ranaut: मी नेतावादी , पण गांधीवादी नाही …, अभिनेत्री कंगनाचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

माझा विश्वास आहे की संघर्ष हा नेताजी आणि सावरकर (वीर सावरकर) सारख्या इतर अनेक क्रांतिकारकांचा आहे. जो पूर्णपणे नाकारले गेला. फक्त ती बाजू दाखवली गेली की आपण उपोषण आणि दांडी मोर्चा करून स्वातंत्र्य मिळवले आहे. तसे नाही.

Kangana Ranaut: मी नेतावादी , पण गांधीवादी नाही ..., अभिनेत्री कंगनाचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Kangana RanautImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 3:14 PM

आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)प्रसिद्ध आहे. अनेकदा ती आपल्या वक्तव्यामुळे अडचणीतही सापडलेली आहे. आता पुन्हा एकदाकंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंगनाने मी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose)यांची अनुयायी’ आहे , महात्मा गांधींची नाही असे वक्तव्य केले आहे. गुरुवारी, कंगनाने दिल्लीतील राजपथ – कर्तव्य पथच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी तिने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना कंगना म्हणाली की, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर(Savarkar) यांचा संघर्ष ‘ पूर्णपणे नाकारला’ गेला आहे. हे सांगत असताना तिने केवळ ‘ उपोषण’ आणि ‘दांडीयात्रा’ करून भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही, असेही कंगनाने म्हटले आहे.

मी नेहमी म्हणते की मी नेतावादी

कंगना हिंदीमध्ये पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की “मी नेहमी म्हणते की मी नेतावादी आहे (नेताजी सुभाष चंद्रवादी, ) मात्र गांधीवादी नाही. प्रत्येकाची स्वतःची विचार करण्याची पद्धत आहे. माझा विश्वास आहे की संघर्ष हा नेताजी आणि सावरकर (वीर सावरकर) सारख्या इतर अनेक क्रांतिकारकांचा आहे. जो पूर्णपणे नाकारले गेला. फक्त ती बाजू दाखवली गेली की आपण उपोषण आणि दांडी मोर्चा करून स्वातंत्र्य मिळवले आहे. तसे नाही. ‘लाखो लोकांनी बलिदान दिले. नेताजींनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला आणि भारताची भीषण परिस्थिती समोर आणण्यासाठी जगभर मोहीम चालवली. त्यांनी एक सैन्यदलही तयार केले. यातून ब्रिटिशांवर दबाव आणण्यात सक्रिय सहभाग घेतला. नेताजी सत्तेचे भुकेलेले नव्हते तर ते स्वातंत्र्याचे भुकेलेले होते आणि त्यांनीच देश स्वतंत्र केला.”

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.