मुंबई – भारतीय चित्रपटसृष्टीत सुरूवातीच्या काळात निसर्ग आणि दोन वेगळवेगळ्या पडद्यावर अभिनेता (actor) आणि अभिनेत्रीचे (actress) शुटिंग (shooting) केले जायचे. त्यावेळी सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे चित्रपट पाहण्यासाठी सीन केले जातात, त्या सीनचा त्यावेळी विचार करणं सुध्दा दुरापास्त होतं. लोकांच्या शब्दांत सांगायचं तर त्यावेळी बोल्ड हा शब्द अधिक लोकांना माहित नव्हता असं आपण म्हणू शकतो. पण त्यावेळी एका अभिनेत्याने आणि अभिनेत्रीने अधिककाळ किसिंग सिन (kissing scenes) केला होता. त्यावेळी भारतीय चित्रपट सृष्टीत खूप मोठा किसिंग सीन झाल्याचे लोकांचे म्हणणे होते.
हा किसिंग सीन त्यावेळी किसींग सीन एका चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला होता. 1933 मध्ये आलेल्या ‘कर्मा ‘ (karma)नावाच्या चित्रपटात त्यावेळी अभिनेत्री देविका रानीचा अभिनेता हिमांशु राय यांच्यात किसिंग सीन अधिककाळा चालला होता. तो त्या काळातला सगळ्यात जास्तवेळ 4 मिनिट किसिंग सीन दाखवण्यात आला होता. त्यावेळी सुध्दा किसिंग सीनची अधिक चर्चा झाली होती. 13 फेब्रुवारीला किस डे होता, त्यावेळी या सीनची अनेकांना आठवण झाली असणार असं वाटतंय.
अभिनेत्रीचा परिचय
देविका राणीला भारतीय चित्रपटसृष्टीतली पहिली अभिनेत्री म्हणटलं जातं त्यावेळी देविकाने अनेक बोल्ड सीन दिले होते. तसेच तिच्या 10 वर्षाच्या काळात ती चांगलीचं लोकप्रिय देखील झाली होती. देविका राणीचा जन्म एका चांगल्या घरात झाला होता. त्यावेळी 9 वर्षाची असताना देविका शिक्षणासाठी इंग्लंड रवाना झाली होती. त्यावेळी जो चित्रपट तयार झाला होता, तो इंग्रजी भाषेत तयार करण्यात आला होता. त्यावेळी तो चित्रपट आवडल्याने त्या चित्रपटाचं हिंदीमध्ये रूपांतर करण्यात आलं परंतु लोकांना ते आवडलं नाही. 1928 मध्ये देविकाने हिमांशु रायसोबत लग्न केले होते.
किसिंग सीन आणि वाद
त्यावेळी किसिंग सीन लोकांनी पाहिल्यानंतर मोठ वाद निर्माण झाला होता, तसेच लोकांनी देविका राणीला गलिच्छ शब्दात टिपणी देखील केली होती. तो इतका मोठा किसिंग सीन होता, की अनेक लोकांनी त्यावेळी चित्रपटाची बदनामी केली. आत्तापर्यंत एवढा मोठी किसिंग सीन कोणत्याच चित्रपटात झालेला नाही. लाईव्ह हिस्ट्री इंडियाच्यानुसार, मुळात तो प्रेमातून झालेला किसिंग नव्हता, तर अभिनेत्याला सापाने चावल्यानंतर तो एका ठिकाणी बेशुध्द अवस्थेत पडतो. त्यावेळी त्याला शुध्दीवर आणण्यासाठी देविका राणीने किसिंग केले आहे. पण हा सीन लोकांना अजिबात आवडला नव्हता. त्यावेळी असं धाडसी दृष्ट त्या चित्रपटातून दाखवण्यात आलं होतं.