Indian Idol 12 | पुन्हा एकदा वादात अडकला ‘इंडियन आयडॉल 12’, ‘या’ स्पर्धकाला बाहेर करण्याची मागणी, जाणून घ्या कारण

सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12)  सध्या सतत चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो कॉन्ट्रोवर्सीचा एक भाग बनला आहे. कधी पाहुण्या परीक्षकांच्या विधानामुळे, तर कधी ट्रोल झाल्यामुळे.

Indian Idol 12 | पुन्हा एकदा वादात अडकला ‘इंडियन आयडॉल 12’, ‘या’ स्पर्धकाला बाहेर करण्याची मागणी, जाणून घ्या कारण
इंडियन आयडॉल 12
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 11:18 AM

मुंबई : सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12)  सध्या सतत चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो कॉन्ट्रोवर्सीचा एक भाग बनला आहे. कधी पाहुण्या परीक्षकांच्या विधानामुळे, तर कधी ट्रोल झाल्यामुळे. आता या स्पर्धेतून स्पर्धक षण्मुखप्रिया (shanmukhpriya) हिला काढून टाकले जाबे, अशी मागणी प्रेक्षकांमधून होत आहे. सोशल मीडियावर, षण्मुखप्रियाला शोमधून बाहेर काढण्यास सांगितले जात आहे. षण्मुखप्रियावर गाजलेले क्लासिक गाणे खराब करण्याचा आरोप लावला जात आहे (Indian Idol 12 audience demands to eliminate shanmukhpriya from show).

गेल्या आठवड्यात इंडियन आयडॉल 12मध्ये दिवंगत दिग्गज संगीतकार श्रवण राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्यामध्ये श्रवण राठोड यांच्या गाण्यांवर स्पर्धकांनी ड्यूएट सादर केल्या. स्पर्धक आशिष याच्यासमवेत ‘हमको सिर्फ तुमसे प्यार है’ या गाण्यावर षण्मुखप्रियाने गाणे सादर केले. हे गाणे कोणत्याही चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही आणि षण्मुखप्रियाला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया :

एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर लिहिले- ‘षण्मुखप्रिया सर्वात निरुपयोगी स्पर्धक आहेत, शो सोडा आणि निघून जा. इंडियन आयडॉल 12 थांबवा. आदित्य नारायण कोणत्याही सबबी देऊ नका.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘षण्मुखप्रिया फक्त किंचाळत आहे, धुन नाही, कॉपी कॅट आहे. ती मधुर गाणी गाऊच शकत नाही. गाणे कसे ओरडावे आणि कसे खराब करावे हेच फक्त तिला माहिती आहे.’(Indian Idol 12 audience demands to eliminate shanmukhpriya from show)

एका वापरकर्त्याने लिहिले, षण्मुखप्रियाला शोमधून काढून टाका. संगीताचा आदर करणारे माझ्यासारखे लोक इंडियन आयडॉलचा तिरस्कार करतात. कृपया हे नाटक थांबवा.’

आदित्य नारायणही झाले ट्रोल

केवळ षण्मुखप्रियाच नाही, तर शोचा होस्ट आदित्य नारायण यालाही ट्रोल केले जात आहे. शो वर, आदित्यने अमित कुमारची खिल्ली उडवता, खास अतिथी म्हणून आलेल्या कुमार सानू, रूपकुमार आणि अनुराधा पौडवाल यांना काही प्रश्न विचारले. ज्यामुळे त्यालाही ट्रोलही केले जात आहे. लोक आदित्यला ‘घमेंडी’ म्हणत आहेत कारण, त्याने अमित कुमार यांचे विधान खोटे असल्याचे सिद्ध करण्यासाठी हे प्रश्न विचारले.

अमित कुमार यांची इंडियन आयडॉलवर टीका

काही आठवड्यांपूर्वी किशोर कुमार विशेष भाग इंडियन आयडॉल 12मध्ये पार पडला. यावेळी किशोर कुमार यांना श्रद्धांजली देण्यात आली. या भागात किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार पाहुणे परीक्षक म्हणून हजार होते. शोनंतर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, मला सर्वांचे कौतुक करण्यास सांगितले गेले. आपण जे काही गायले, त्याला उत्तेजन द्यावे लागले. पैशांच्या गरजेमुळे आपण शोमध्ये गेलो, असेही त्यांनी सांगितले. मी मागितलेल्या पैशांची माझी मागणी पूर्ण केली, मग मी का नको जाऊ, म्हणूनच मी शोमध्ये गेलो होतो, असे देखील ते म्हणले होते.

(Indian Idol 12 audience demands to eliminate shanmukhpriya from show)

हेही वाचा :

PHOTO | दक्षिणेतल्या ‘लेडी सुपरस्टार्स’ बॉलिवूडमध्ये धमाका करण्यास सज्ज, पाहा कोणत्या चित्रपटातून करणार पदार्पण

Photo : पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खानची ‘या’ बाबतीत माहिरा खानवरही मात; मृत्यूचीही उडाली होती अफवा

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.