Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Idol 12 | षण्मुखप्रियासह तिच्या आईचे ट्रोलर्सना धडधडीत उत्तर, मायकल जॅक्सनचं उदाहरण देत म्हणाल्या…

सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ची (Indian idol 12) स्पर्धक षण्मुखप्रिया (Shanmukh priya) हिला या स्पर्धेची संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. आपल्या मधुर आवाजाने, षण्मुखप्रियाने परीक्षक आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.

Indian Idol 12 | षण्मुखप्रियासह तिच्या आईचे ट्रोलर्सना धडधडीत उत्तर, मायकल जॅक्सनचं उदाहरण देत म्हणाल्या...
षण्मुख प्रिया
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 11:33 AM

मुंबई : सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ची (Indian idol 12) स्पर्धक षण्मुखप्रिया (Shanmukh priya) हिला या स्पर्धेची संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. आपल्या मधुर आवाजाने, षण्मुखप्रियाने परीक्षक आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आपल्या गायन कौशल्यामुळे परिचित असलेल्या या 17 वर्षीय स्पर्धकाला तिच्या संगीता कौशल्यावर वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. पण नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष भागानंतर षण्मुखप्रियाला खूप ट्रोल केले गेले (Indian Idol 12 Shanmukh priya and her Mother gives reply to trolषण्मुखप्रियासह तिच्या आईचे ट्रोलर्सना धडधडीत उत्तर, मायकल जॅक्सनचं उदाहरण देत म्हणाल्या…lers on social media).

काही नेटकऱ्यांनी या शोमध्ये षण्मुख प्रियाने गायलेल्या श्रवण राठोड यांच्या ‘हमको सिर्फ तुमसे प्यार है’ या गाण्यावर खूप टीका केली आहे. इतकेच नव्हे तर, तिला या स्पर्धेतून बाद करण्याची मागणी देखील केली होती. मात्र, आता षण्मुख प्रिया आणि तिच्या आईने या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

षण्मुख प्रियाच्या म्हणण्यानुसार, ती सहसा अशा ऑनलाईन टिप्पण्या वाचण्यास नकार देते. परंतु ट्रोलर्सवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ती म्हणाली, जेव्हा माझ्या काही चाहत्यांनी मला ही ट्वीट दाखवली, तेव्हा मला या घटनेची माहिती मिळाली. आधी माझा अजिबात विश्वास नव्हता. परंतु तरीही प्रत्युत्तर देऊन मला यापुढे आणखी चर्चे करणे आवडत नाही.

प्रयोग करताना टीका ऐकून घ्यावी लागते!

या संपूर्ण घटनेवर प्रकाश टाकताना षण्मुख प्रियाची आई, श्रीमती रत्नमाला म्हणाल्या की, गेल्या तीन आठवड्यांपासून तिला प्रियाविरूद्ध बर्‍याच नकारात्मक टिप्पण्या आणि प्रतिक्रिया दिसू लागल्या आहेत. या टिप्पण्यांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘षण्मुखप्रिया तिच्या या कौशल्यावर वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन शैली वापरण्याचा प्रयत्न करत आहे. ती तिच्या नेहमीच्या शैलीमध्ये काहीसे बदल करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून लोकांना ते ऐकण्यात भिन्न वाटेल.’(Indian Idol 12 Shanmukh priya and her Mother gives reply to trollers on social media)

बचावासाठी आई आली पुढे

षण्मुख प्रियाची आई सांगते, ‘हा गाण्यांच्या निवडीचा प्रश्न आहे, इंडियन आयडॉलचे सर्व स्पर्धक निर्मात्यांनी दिलेली गाणी सादर करतात. पण या सर्व टीका होत असूनही माझी मुलगी प्रेक्षकांकडून दुप्पट प्रेम आणि आपुलकी मिळवते आहे. यामुळे मी खूप भाग्यवान आहे.’

नेहमीच ‘बेस्ट’ सादरीकरण करणार!

षण्मुखप्रिया पुढे म्हणाली की, ‘मायकल जॅक्सनसारख्या दिग्गज कलाकारालाही टीकेचा सामना करावा लागला. मी त्याच्या समोर एक छोटी कलाकार आहे. मला फक्त माझे संगीत माहित आहे, त्यामुळेच मी आज या टप्प्यावर आले आहे. कारण मला गाणे सादर करणे आवडते. माझा विश्वास आहे की, आपले काम नेहमी बोलते आणि मी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन.’

(Indian Idol 12 Shanmukh priya and her Mother gives reply to trollers on social media)

हेही वाचा :

Photo : ‘सुंदरा मनामध्ये भरली’, अभिनेत्री अक्षया नाईकचा ग्लॅमरस अवतार पाहिलात?

Controversy | ‘The Family Man 2’च्या वादावर मनोज बाजपेयीचं जाहीर निवेदन, सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाले…

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.