मुंबई : हिंदी कलाविश्वास इंडियन आयडॉलने (Marathi Indian Idol) देशाला अनेक नवोदित गायक, गायिका दिल्या. त्यानंतर हा शो मराठीत उतरला आणि त्याने आता सागर म्हात्रेच्या (Sagar Mhatre) रुपात पहिला मराठी इंडियन आयडॉल दिला आहे. आज मराठी इंडियन आयडॉलचा ग्रँड फिनाले पार पडला. त्यात पनवेलचा (Panvel) असणारा सागर म्हात्रे विजयी ठरलाय. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ म्हणत हा मराठी इंडियन आयडॉल हा शो मराठी प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला होता. या शो मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामुळे पहिला मराठी इंडियन आयडॉल कोण मिळणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. अतिशय रोमहर्षक ठरलेल्या ग्रँड फिनालेत पनवेलच्या सागर म्हात्रेने बाजी मारली.
सागर म्हात्रे हा पेशाने इंजिनियर आहे. मात्र गोड गळा लाभलेल्या या तरुणाने रसिकांच्या मनात घर केलं आहे. त्याचं संगितावरील प्रेम, गोड आवाज आणि उत्तम सादरीकरणाच्या जोरावर त्याने महाराष्ट्रातील रसिकांना खिळवून ठेवलं होतं. सागरला अनेकदा परीक्षकांकडून झिंगाट परफॉर्मन्स मिळाला. तसंच त्याच्या रमजा जोगी या गाण्याला परीक्षकांनी उभे राहत दाद दिली होती. अशा या रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या सागर म्हात्रेने मराठी इंडियन आयडॉलच्या ट्रॉफीवरही आपलं नाव कोरलं आहे.
‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या सीजनचा विजेता आहे सागर म्हात्रे!#इंडियनआयडलमराठी | #IndianIdolMarathi#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati pic.twitter.com/RlaEDHUDYq
— Sony मराठी (@sonymarathitv) April 20, 2022
मराठी इंडियन आयडॉलमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून महाराष्ट्राला टॉप 5 स्पर्धक मिळाले. त्यात परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. पहिल्यांदाच मराठी भाषेत ‘इंडियन आयडल’ सुरू झालं आणि अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं होतं.
प्रत्येकाच्या आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. टॉप 14 मधून बाजी मारलेल्या टॉप 5 शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या संपूर्ण पर्वात अनेक पाहुण्यांनी विशेष हजेरी लावली आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं.
इतर बातम्या :