भारतातील सर्वाधिक कमाई KGF:Chapter 2 वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरसाठी सज्ज ; ‘या’ वाहिनीवर होणार प्रेक्षपित
सिनेमाला कोणत्याही प्रकारच्या सीमा नसतात, तसेच माध्यमाचे बंधनही नसते. टेलिव्हिजन माझ्यासाठी नेहमीच खूप खास असेल. मी सोनी मॅक्सच्या माध्यमातून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्सुक आहे. आणि मला आशा आहे की ज्यांनी KGF पाहिला आहे. ते सर्वजण KGF- 2 चा त्यांच्या घरात घरच्या आरामात बसून पुन्हा एकदा याचा आनंद घेतील
बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीही गाजवणारा ब्लॉकबस्टर चित्रपट KGF: Chapter 2 चा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर(Box office) 1000 कोटींचा टप्पा पार करणारा हा चित्रपट आता छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. यशने दिलेल्या माहितीनुसार, ‘KGF: Chapter 2’ सोनी मॅक्सवरील जागतिक टेलिव्हिजन प्रीमियरसाठी सज्ज आहे. प्रशांत नील दिग्दर्शित, या वर्षातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर्सपैकी एक असलेला हा चित्रपट येत्या 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता सोनी मॅक्सवर(Soni max) प्रदर्शित होणार आहे. KGF 2 च्या जागतिक टीव्ही प्रीमियरबद्दल बोलतांना, यश म्हणाला, “एक टीम म्हणून, आमच्याकडे एक उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव तयार करण्याचा दृष्टीकोन होता. तो आमच्या देशाच्या आणि जगाच्या प्रत्येक भागात उपलब्ध व्हावा अशी आमची इच्छा होती. जगभरातील लोकांसाठी. KGF Chapter 2 ने सिनेमाप्रेमींना एकत्र आणले आणि एक दमदार कथा सांगितली. प्रेक्षकांनी आमच्यावर जे प्रेम केले ते अविश्वसनीय आहे.”
अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी सज्ज
अभिनेत्याने पुढे जोडले की तो टीव्ही प्रीमियरद्वारे अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास उत्सुक आहे. यश म्हणाला, “माझा विश्वास आहे, की सिनेमाला कोणत्याही प्रकारच्या सीमा नसतात, तसेच माध्यमाचे बंधनही नसते. टेलिव्हिजन माझ्यासाठी नेहमीच खूप खास असेल. मी सोनी मॅक्सच्या माध्यमातून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्सुक आहे. आणि मला आशा आहे की ज्यांनी KGF पाहिला आहे. ते सर्वजण KGF- 2 चा त्यांच्या घरात घरच्या आरामात बसून पुन्हा एकदा याचा आनंद घेतील.” विशेष म्हणजे, KGF Chapter 2 मध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यानंतर हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.