तुम्हाला माहित आहे का 71 गाणी असलेला हिंदी चित्रपट? अनेक महत्त्वाच्या परीक्षेतही आलाय हा प्रश्न!

भारतीय चित्रपटांमध्ये संगीत नसेल, तर ते चित्रपट काहीसे निरस वाटतात. संगीतामुळे चित्रपटाला एक अप्रतिम शक्ती मिळते. संगीत ही एक अशी कला आहे, जी उदास मनाला देखील प्रफुल्लीत करते. एरव्ही आपल्याला विचारले की, एखाद्या चित्रपटात किती गाणी असू शकतात?

तुम्हाला माहित आहे का 71 गाणी असलेला हिंदी चित्रपट? अनेक महत्त्वाच्या परीक्षेतही आलाय हा प्रश्न!
इंद्रसभा
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 9:30 AM

मुंबई : भारतीय चित्रपटांमध्ये संगीत नसेल, तर ते चित्रपट काहीसे निरस वाटतात. संगीतामुळे चित्रपटाला एक अप्रतिम शक्ती मिळते. संगीत ही एक अशी कला आहे, जी उदास मनाला देखील प्रफुल्लीत करते. एरव्ही आपल्याला विचारले की, एखाद्या चित्रपटात किती गाणी असू शकतात? तर, आपले उत्तर काय असेल? 6, 8, 10 किंवा 20…  पण खरंच एखाद्या चित्रपटात इतकी गाणी असू शकतात का? होय, एका हिंदी चित्रपटात 10-20 नव्हे तर, तब्बल 71 गाणी होती. चला तर, जाणून घेऊया या सर्वाधिक गाणी असलेल्या चित्रपटाबद्दल…( Indra Sabha an Iconic Indian film with 71 songs)

या चित्रपटाच्या 71 गाण्यांचा रेकॉर्ड अद्याप कोणीही मोडलेला नाही. 1932 मध्ये रिलीज झालेल्या ‘इंद्रसभा’ (Indra Sabha) चित्रपटाबद्दल आपण बोलत आहोत. जवळपास तीन तासांच्या या चित्रपटात 71 गाणी आहेत. या चित्रपटाविषयी आणि त्यातील गाण्यांविषयी बोलण्यापूर्वी, आपण चित्रपटाच्या सुवर्ण काळाबद्दल जाणून घेऊया. 1913मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारतातील पहिला चित्रपट तयार झाला, ज्याची निर्मिती दादासाहेब फाळके यांनी केली होती.

भारतीय चित्रपटात संगीताचे महत्त्व

1913पासून ते 1934 पर्यंत भारतात सुमारे 1200 मूक चित्रपटांची निर्मिती झाली. तथापि, यातील काही मोजकेच चित्रपट सध्या पाहण्यास उपलब्ध आहेत, जे प्रेक्षक YouTube वर किंवा इतर प्रवाहातील प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 1931मध्ये मूक चित्रपटांनंतर हा भारताचा पहिला बोलका चित्रपट आला. ‘आलम आरा’ असे या चित्रपटाचे नाव होते. हिंदी टॉकी चित्रपटाच्या सुरूवातीबरोबर त्याचवर्षी तामिळ आणि तेलगू टॉकी चित्रपटांनासुद्धा सुरुवात झाली.

भारतीय चित्रपटसृष्टीत सुरुवातीपासूनच संगीत खूप महत्वाचे आहे. चित्रपटातून करमणूक करण्यात गाण्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे जर म्हटले असेल तर कदाचित ते चुकीचे ठरणार नाही. ‘आलम आरा’ मध्येही केवळ 7 गाणी होती. ‘आलम आरा’नंतर भारताला पहिला चित्रपट मिळाला, ज्याने त्याच्या गाण्यांनी सर्वांनाच चकित केले, हा चित्रपट होता ‘इंद्रसभा’. या चित्रपटात तब्बल 71 गाणी होती. चित्रपटाचे दिग्दर्शन जे जे मदन यांनी केले होते. आघा हसन अमानत यांनी 1853 मध्ये लिहिलेल्या याच नावाच्या उर्दू नाटकावर हा चित्रपट आधारित होता. ‘इंद्रसभा’ चित्रपटाचे संगीतकार नगरादास होते, जे या चित्रपटानंतर खूप लोकप्रिय झाले (Indra Sabha an Iconic Indian film with 71 songs).

या चित्रपटातून शास्त्रीय आणि लोकगीतांची निर्मिती चांगली झाली. या चित्रपटात ठुमरी, गझल, गाणी, चौबोला (पाकिस्तानच्या काव्य परंपरेत, लोककथेत वापरल्या जाणार्‍या वापरल्या जाणार्‍या ओळी) आणि श्लोक यांचा समावेश होता. असं म्हणतात की या चित्रपटात संपूर्ण 71 गाणी होती. अनेकदा सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणार्‍या परीक्षांमध्येही असा प्रश्न विचारला जातो की, कोणत्या भारतीय चित्रपटात सर्वाधिक गाणी आहेत? तथापि, आता या चित्रपटातील केवळ काहीच गाणी अशी आहेत, ज्यांच्या काही प्रिंट शिल्लक आहेत.

हळू हळू बंद झाली अधिक गाण्यांची परंपरा

या चित्रपटानंतर हळूहळू चित्रपटांमधील गाण्यांची संख्या कमी होऊ लागली. यानंतर 1943 मध्ये आलेल्या ‘शकुंतला’ या चित्रपटात 42 गाणी होती. 90च्या दशकापर्यंत काही चित्रपट बनले ज्यात 12 किंवा 14 गाणी होती. 1994मध्ये आलेला ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाचा समावेशही अधिक गाणी असलेल्या चित्रपटांच्या यादीत करण्यात आला होता. या चित्रपटात देखील 14 गाणी होती. त्याचप्रमाणे ‘सिलसिला’, ‘मोहब्बतें’ आणि ‘ताल’ असे अनेक चित्रपट आहेत ज्यात 10हून अधिक गाणी आहेत.

(Indra Sabha an Iconic Indian film with 71 songs)

हेही वाचा :

‘मर्डर’मधील बोल्ड दृश्यानंतर लोकांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलली, मल्लिका शेरावतने व्यक्त केलं दुःख!

Khatron Ke Khiladi 11: आरा रा रा खतरनाक… कधी साडी, तर कधी शॉर्ट ड्रेस… श्वेता तिवारीचा जलवा पाहाच!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.