Inside Story | शाहरुख खानच्या वडिलांनी खरंच नाकारला होता ‘मुगल-ए-आजम’? जाणून घ्या ‘या’ मागचं सत्य…

भारतीय चित्रपट सृष्टीत असे अनेक चित्रपट बनवले गेले, ज्याने केवळ इतिहासच रचला नाही, तर आपल्या मनावर आणि समजावरही छाप पाडली. अशाच चित्रपटांपैकी एक होता दिवंगत चित्रपट निर्माते के.के. आसिफ (K. Asif) यांचा 'मुगल-ए-आजम' हा चित्रपट.

Inside Story | शाहरुख खानच्या वडिलांनी खरंच नाकारला होता ‘मुगल-ए-आजम’? जाणून घ्या ‘या’ मागचं सत्य...
ताज मोहम्मद खान
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 9:46 AM

मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीत असे अनेक चित्रपट बनवले गेले, ज्याने केवळ इतिहासच रचला नाही, तर आपल्या मनावर आणि समजावरही छाप पाडली. अशाच चित्रपटांपैकी एक होता दिवंगत चित्रपट निर्माते के.के. आसिफ (K. Asif) यांचा ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट. हा चित्रपट 1960मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी बरीच वर्षे लागली होती. या दरम्यान या चित्रपटात अनेक कलाकारांचा सहभाग झाला होता, त्यामुळे अनेकांना नकार देखील देण्यात आला. त्यापैकीच, एक नावं होतं शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे वडील ताज मोहम्मद खान (taj mohammad khan) (Inside Story is it real that shah rukh khan father taj mohammad khan rejects Mughal E Azam).

प्रख्यात लेखक राजकुमार केसवानी, जरी आता लोकांमध्ये नसले तरी आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कथा, किस्से प्रेक्षकांशी शेअर केले आहेत. यातील एक गोष्ट म्हणजे शाहरुख खानचे वडील ताज मोहम्मद खान यांच्याबद्दलही होती, ही त्यांच्या ‘मुगल-ए-आजम’ या पुस्तकातही वाचायला मिळते. शाहरुख खानचा हवाला देत त्यांनी ही घटना लिहिली आहे.

शाहरुख खानच्या वडिलांनी खरोखरच मुगल-ए-आजम नाकारला होता?

माध्यमांच्या रिपोर्टनुसार शाहरुख खानच्या वडिलांना ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटात राजा मान सिंहची भूमिका साकारण्याची ऑफर देण्यात आली होती. शाहरुखचे वडील व्यवसायाने वकील असल्याने त्यांना अभिनयाची आवड नव्हती, म्हणून त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला. बॉलिवूडच्या कॉरिडोरमध्ये बरीच वर्षे ही कहाणी चर्चिली जात होती (Inside Story is it real that shah rukh khan father taj mohammad khan rejects Mughal E Azam).

जाणून घ्या काय आहे नेमके सत्य…

आता या किस्स्याचा दुसरा पैलू आणि जे सत्य म्हणूनही मानले जाऊ शकते, जो ताज मोहम्मदचा मुलगा शाहरुख खान यांच्या हवाल्याने लिहिला आहे. राजकुमार केसवानी यांच्या मुगल-ए-आजम या पुस्तकात शाहरुख खानच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील ताज मोहम्मद खान हेही त्या चित्रपटासाठी ऑडीशन देणाऱ्यांपैकी एक होते ज्यांना मुगल-ए-आजममध्ये भूमिका मिळवायची इच्छा होती, परंतु ते के. आसिफच्या परीक्षेत यशस्वी ठरले नाहीत.

इतकेच नाही तर एका कार्यक्रमादरम्यान स्वत: शाहरुख खानने माध्यमांशी बोलताना या किस्स्याचा उल्लेख केला. वास्तविक, काही वर्षांपूर्वी ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटासंदर्भात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान शाहरुखने खुलासा केला होता की, त्याचे वडील ताज मोहम्मद यांनी एक दिवस ‘मुगल-ए-आजम’ मध्ये काम केले आणि त्यानंतर के.के. असिफ यांनी तुला अभिनय जमत नाहीय, असे म्हणत त्यांना काढून टाकले होते. इतकेच नाही तर, दिग्दर्शकाने त्यांना जाऊन अभिनेता जन्माला घाल, असा सल्ला दिला होता.

शाहरुख खानने या संदर्भात खुलासा केला असला, तरी आजपर्यंत अशा बातम्या चर्चिल्या जातात की, ‘मला नाटकामध्ये काम करण्याची आवड नाही’, असे सांगून शाहरुखच्या वडिलांनी हा चित्रपट नाकारला होता. तथापि, राजकुमार केसवानी यांच्या पुस्तकातील हा किस्सा काहीतरी वेगळेच सांगतो.

(Inside Story is it real that shah rukh khan father taj mohammad khan rejects Mughal E Azam)

हेही वाचा :

Indian Idol : TRP साठी करावं लागतं स्पर्धकांचं खोटं कौतुक; सुनिधी चौहानचा मोठा खुलासा

Photo : ‘कोरोना रिकव्हरी फार सोप्पी नाही…’, मलायका अरोराकडून कोरोनाकाळातील अनुभव शेअर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.