Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नाव सुचत नव्हतं, इतक्यात त्यांनी दरवाजा ठोठावला..’, वाचा ‘धनंजय माने इथेच राहतात का?’चा किस्सा…

सुरुवातीला निर्माते-दिग्दर्शकांना या पात्रासाठी आडनावच सुचत नव्हते. इतक्यात एक अशी घटना घडली की, त्यावरूनच पात्राला आडनाव मिळालं आणि चित्रपटाला अजरामर संवाद. या संवादा मागचा हा खास किस्सा शेअर केलाय अभिनेता किरण माने यांनी...

‘नाव सुचत नव्हतं, इतक्यात त्यांनी दरवाजा ठोठावला..’, वाचा ‘धनंजय माने इथेच राहतात का?’चा किस्सा...
अशी ही बनवा बनवी
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 9:12 AM

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातला सगळ्यात गाजलेला आणि बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवा बनवी’ (ashi hi banwa banwi). आजही हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना तितकीच भुरळ घालतो आणि पोट धरून हसायला भाग पाडतो. यातील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहिली. अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), प्रिया अरुण (Priya Berde), सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) आणि इतरही बऱ्याच कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या (Interesting story behind ashi hi banwa banwi iconic dialogue Dhananjay mane ithech rahtat ka).

‘आमच्या शेजारी राहते. नवऱ्याने टाकलंय तिला…’, ‘सारखं सारखं एकाच झाडावर काय?’, ‘सत्तर रुपये वारले’ अशे अनेक संवाद आजही चित्रपट रसिकांच्या जीभेवर रेंगाळताना दिसतात. याच चित्रपटातील आणखी एक संवाद तुफान गाजला आणि तो म्हणजे ‘धनंजय माने इथेच राहतात का?’. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या तोंडी असलेला हा संवाद प्रचंड लोकप्रिय झाला. चित्रपटाला जवळपास 32 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही या लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. मात्र, सुरुवातीला निर्माते-दिग्दर्शकांना या पात्रासाठी आडनावच सुचत नव्हते. इतक्यात एक अशी घटना घडली की, त्यावरूनच पात्राला आडनाव मिळालं आणि चित्रपटाला अजरामर संवाद. या संवादा मागचा हा खास किस्सा शेअर केलाय अभिनेता किरण माने यांनी…

वाचा नेमकं काय घडलं….

“खरंतर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरज जाणवली नाही… पण परशा जेव्हा दार ठोठावतो, तेव्हा त्यानं पूर्ण नांव घ्यायची गरज आहे.” त्याला कुठलं आडनांव शोभेल? याचा सचिन पिळगांवकर – वसंत सबनीस वगैरे लोक व्ही. शांताराम यांच्या ऑफीसमध्ये विचार करत बसले होते… बरीच आडनांवं सुचत होती पण कुणाचं समाधान होत नव्हतं…( Interesting story behind ashi hi banwa banwi iconic dialogue Dhananjay mane ithech rahtat ka)

एवढ्यात व्ही. शांताराम दाराकडे पाहून म्हणाले, “या या माने.. काय काम काढलंत?”  व्ही. शांताराम यांचे सी.ए. किसन माने आले होते. त्यांना काही कागदपत्रांवर व्ही. शांताराम यांच्या सह्या हव्या होत्या. ‘त्या’ हाकेनं चर्चेच्या वेळी असं टायमिंग साधलं होतं की त्यांच्या सह्या होईस्तोवर सचिनजी आणि वसंत सबनीसांनी ठरवून टाकलं की त्या पात्राचं आडनाव ‘माने’ हेच असेल !!!

.. मिटींग संपता-संपता व्ही. शांताराम यांनी किसन मानेंना पुन्हा त्यांच्या केबिन मध्ये बोलावून घेतले आणि हसत-हसत विचारलं की “माने तुमचं आडनाव आमच्या सिनेमातल्या ‘धनंजय’ या पात्राला वापरायला तुमची काही हरकत नाही ना?” केबिनमध्ये हास्यकल्लोळ उसळला…

…आणि संपूर्ण मराठी मुलखात हास्यकल्लोळ उसळवणारा तो ‘अजरामर’ डायलॉग जन्माला आला -“धनंजय माने इथेच रहातात का?”

विक्रम मानेंनी सांगितला किस्सा…

याबद्दल सांगताना किरण माने म्हणतात, ‘किसन माने यांचे चिरंजीव विक्रम माने माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये आहेत… त्यांनी एक दिवस इनबॉक्स मध्ये ठकठक केलं “किरण माने इथंच रहातात का?” …आणि मला ही घटना सांगीतली. लै भारी वाटलं… म्हन्लं, मी हा किस्सा फेसबुकवरून दोस्त लोकांना सांगू का? तुमची काही हरकत नाही ना? नाही तर पुन्हा म्हणाल,”हा शुद्ध हलकटपणा आहे माने !”(Interesting story behind ashi hi banwa banwi iconic dialogue Dhananjay mane ithech rahtat ka)

पाहा किरण माने यांची पोस्ट

(Interesting story behind ashi hi banwa banwi iconic dialogue Dhananjay mane ithech rahtat ka)

हेही वाचा :

Jivalaga : प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा तडका, ‘जिवलगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नगर”सेवकां”चा पगार 25 हजार, नाही हो परवडत, Fortuner चा हफ्ताच 30 हजार, आस्ताद काळेच्या कानपिचक्या

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.