International Women’s Day 2021 | ‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘थलायवी’, यंदा बॉलिवूडमध्येही दिसणार ‘महिला शक्ती’!

यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्येही ‘महिलाशक्ती’चा बोलबाला पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षात बॉलिवूडची ‘वूमन पॉवर’ दाखवणारे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

International Women’s Day 2021 | ‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘थलायवी’, यंदा बॉलिवूडमध्येही दिसणार ‘महिला शक्ती’!
यंदा बॉलिवूडमध्ये दिसणार ‘महिला शक्ती’!
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 10:35 AM

मुंबई : आज अर्थात 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ ( 2021) म्हणून जगभर साजरा केला जातो. तथापि, अजूनही भारतातील महिलांना बर्‍याच गोष्टींसाठी खूप संघर्ष करावा लागतो. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळी थीम असते आणि यावेळी नवीन चॅलेंज स्वीकारण्याची थीम आहे. इतकेच नव्हे तर, यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्येही ‘महिलाशक्ती’चा बोलबाला पाहायला मिळणार आहे. चला तर, जाणून घेऊया यंदाच्या वर्षात बॉलिवूडची ‘वूमन पॉवर’ दाखवणारे कोणते चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत…(International Women’s Day 2021 upcoming Bollywood films on Women power)

थलायवी

अभिनेत्री कंगना रनौत हिच्या ‘थलावी’ चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री-दिवंगत नेत्या जयललिता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. जयललिता त्यांच्या राजकीय कारकीर्दीत 6 वेळा मुख्यमंत्री झाल्या आणि तामिळनाडूमध्ये ‘अम्मा’ म्हणून प्रसिद्ध झाल्या. या चित्रपटासाठी कंगनाने तिच्या लूक आणि बॉडीवर खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट यावर्षी 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.

गंगूबाई काठियावाडी

आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’चा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता, ज्यांला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची कथा एका प्रसिद्ध माफिया क्वीनची आहे. गंगूबाईंना त्यांच्या पतीने अवघ्या 500 रुपयात विकले होते. या नंतर त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या महिलांच्या भविष्यासाठी त्यांनी केलेले कार्य, या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

धाकड

कंगना रनौतचा ‘धाकड’ हा चित्रपट देखील याच वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात कंगना एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट भारताचा पहिला ‘वूमन लीड अ‍ॅक्शन फिल्म’ असल्याचा दावा कंगनाने केला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून आतापर्यंत आलेल्या कंगनाच्या सर्व पोस्टर्समध्ये कंगनाचा जबरदस्त लूक दिसला आहे. या चित्रपटात कंगनासोबत अभिनेता अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 1 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे (International Women’s Day 2021 upcoming Bollywood films on Women power).

शाबास मिठू

अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच क्रिकेटर मिताली राजचा बायोपिक ‘शाबाश मिठू’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठी तापसीने लूक चेंज केला आहे. मिताली राज भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आहेत. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि महिला एकदिवसीय सामन्यात 6 हजाराहून अधिक धावा मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला क्रिकेटपटू आहेत. यापूर्वी यावर्षी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 5 फेब्रुवारी होती, परंतु कोव्हिडमुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

रश्मी रॉकेट

‘रश्मी रॉकेट’ ची कथा खेड्यातील एका अल्पवयीन मुलीची आहे. जिला उत्तम धावपटू बनण्याचं जणू वरदानच मिळालं आहे. तिच्या अतुलनीय वेगामुळे गावकरी तिला ‘रॉकेट’ म्हणून ओळखतात. जेव्हा जेव्हा तिला आपली प्रतिभा दर्शवण्याची संधी मिळते, तेव्हा तेव्हा ती ही संधी तिच्या हातातून जाऊ देत नाही.

तेजस

कंगना रनौतचा आणखी एक चित्रपट ‘तेजस’ एका धाडसी महिला फाइटर पायलटची कथा सांगणारा आहे. या चित्रपटात कंगना ‘भारतीय हवाई दलातील अधिकारी’ साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी ‘या’ चित्रपटाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला होता, ज्याला प्रेक्षकांनी छान प्रतिसाद दिला होता.

(International Women’s Day 2021 upcoming Bollywood films on Women power)

हेही वाचा :

Priyanka Chopra : न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राचा ‘देसी तडका’; नवे रेस्टॉरंट उघडले!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.