IPL 2024 : अनुष्का अकायसोबत भारतात परतणार ? IPL मध्ये विराटला करणार सपोर्ट ?

आयपीएलच्या नव्या हंगामाला कालपासून मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. विराट कोहलीच्या आरसीबीला पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सकडून पराभव पत्करावा लागला. पण सध्या विराटला चिअर करण्यासाठी अनुष्का नेहमीप्रमाणे स्टेडिअममध्ये दिसत नाहीये. गेल्या महिन्यात मुलगा अकायचा जन्म झाल्यापासून अनुष्का लंडनमध्येच आहे. मात्र येत्या काही काळातच ती आयपीएल सामन्यांसाठी हजेरी लावू शकते अशी चर्चा आहे.

IPL 2024 :  अनुष्का अकायसोबत भारतात परतणार  ?  IPL मध्ये विराटला करणार सपोर्ट ?
अनुष्का शर्मा आयपीएल सामन्यासाठी कधी उपस्थित राहणार ?
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 11:32 AM

IPL 2024 ला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला चेन्नई सुपरकिंग्सकडून पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागली. चुरशीच्या या सामन्याचा सर्वांनीच आनंद लुटला. पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला तरी विराटही खूप जोशमध्ये दिसून आला. मात्र त्याला चिअर करण्यासाठी त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही मात्र यंदा स्टेडिअममध्ये दिसली नाही. अनुष्का आणि विराट यांना गेल्याच महिन्यात पुत्ररत्न झालं. 15 फेब्रुवारीला अनुष्काने मुलाला जन्म दिला. मात्र ‘अकाय’च्या (मुलाचं नाव) जन्माची ही गुड न्यूज दोघांनीही आठवडाभराने सोशल मीडियावरून सर्वांशी शेअर केली. सध्या अनुष्का अकायसोबत लंडनमध्येच आहे, तर विराट गेल्या आठवड्यात आयपीएलसाठी भारतात परतला.

तसं पहायला गेलं तर आयपीएल असो किंवा इतर कोणताही सामना, अनुष्का शर्मा बऱ्याच वेळा विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसते. त्यांचे अनेक क्युट मोमेंट्स, व्हिडीओही व्हायरल होत असता. मात्र यावेळेस अनुष्का अद्याप तरी आयपीएलसाठी आलेली नाही. नवजात बाळाची काळजी घेत ती लंडनमध्येच थांबली आहे.

लवकरत येणार भारतात ?

मात्र काही रिपोर्ट्सनुसार, येत्या काही दिवसांतच अनुष्का ही भारतात परतणार असल्याचे समजते.लवकरच ती भारतात येणार असून आरसीबीच्या सामन्यांदरम्यान विराटला चिअर करण्यासाठी ती स्टेडिअममध्ये देखील हजर राहील अशी चर्चा आहे. अकाय महिन्या-दीड महिन्याचा झाल्यानंतर अनुष्काला ट्रॅव्हलिंग करणं सोपं होईल. सध्या अनुष्का तिच्या आणि अकायच्या तब्येतीवर विशेष लक्ष देत आहे. येत्या काही काळातच ती भारतात परतू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिला स्टेडिअममध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत

6 वर्षापांसून चित्रपटांपासून दूर अनुष्का

2018 मध्ये आलेल्या झिरो चित्रपटात अनुष्का शर्मा शेवटची दिसली होती. शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत या दोघांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. मात्र या चित्रपटानंतर अनुष्का मोठ्या पडद्यापासून दूरच आहेत. या काळात ती कोणत्याही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेली नाही. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या कला चित्रपटात तिने छोटीशी, कॅमिओ भूमिका साकारली होती. या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि बाबिल खान मुख्य भूमिकेत होते. याशिवाय अनुष्का तिच्या ‘चकदे एक्सप्रेस’ या चित्रपटाचे शूटिंगही करत होती. मात्र, सध्या ती आई बनण्याची जबाबदारी पार पाडत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.