परिणीती-राघवचा गुपचूप झाला साखरपुडा ? दोघांनी एन्जॉय केली डिनर डेट, बोटातील अंगठीने वेधले लक्ष
Parineeti-Raghav : अभिनेत्री परिणीत चोप्रा आणि राघव चढ्ढा या दोघांच्या नात्याची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू असून नुकतेच ते मुंबईत एका रेस्टॉरंट बाहेर दिसले होते. यादरम्यान अभिनेत्रीच्या अनामिकेमध्ये हिऱ्याची अंगठीही दिसली. त्यामुळे या जोडप्याने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti chopra )गेल्या काही दिवसांपासून तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीचे नाव आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (raghav chaddha) यांच्याशी जोडले जात आहे. परिणीती चोप्रा लवकरच राघव चढ्ढासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. जरी या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल काहीही स्पष्ट केले नसले तरी गेल्या काही महिन्यांत ते अनेक वेळा एकत्र दिसले आहेत.
रविवारीसुद्धा परिणीती आणि राघव मुंबईतील वांद्रे येथे एका रेस्टॉरंट बाहेर दिसले होते. रंजक गोष्ट अशी आहे की यादवेळी परिणीतीच्या अनामिकेमध्ये हिऱ्याची अंगठीही दिसली. त्यामुळे या जोडप्याने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सुरू आहे.
परिणीती-राघवने एन्जॉय केली डिनर डेट
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटसाठी आल्याचे दिसले. रेस्टॉरंटमधून बाहेर येताच पापाराझींनी या कथित जोडप्याला क्लिक केले. यादरम्यान परिणीती चोप्रा जॅकेटसह काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उत्कृष्ट दिसत होती. स्लिंग बॅग आणि पांढरे स्नीकर्स घालून तिने तिचा लूक पूर्ण केला. तर ग्रे शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये राघव चढ्ढाही डॅशिंग दिसत होते.
View this post on Instagram
सर्वांचे लक्ष मात्र बोटातील अंगठीवर
विशेष म्हणजे राघवसोबत डेट नाईट एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलेल्या अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अनामिकेतील मोठ्या हिऱ्याच्या अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधले. परिणीती आणि राघवची एंगेजमेंट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
View this post on Instagram
आयपीएल मॅचचाही लुटला होता आनंद
याआधी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा बरेच वेळेस एकत्र दिसले आहेत. काही दिवसांपूर्वीच ते दोघेही आयपीएल मॅच पाहण्यासाठी एकत्र आले होते. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. यादरम्यान दोघांचे चांगले बाँडिंग पाहायला मिळाले. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.
परिणीती आणि राघव चड्ढा स्टेडियममध्ये एकत्र दिसले तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साह संचारला होता. या दोघांचे स्टेडियममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.