Isha Ambani Met Gala 2023 : मेट गालामध्ये इशा अंबानीचा ग्लॅमरस लूक, आलिया-प्रियांकालाही मागे टाकलं !

न्यूयॉर्कमध्ये आयोजित मेट गाला 2023 मध्ये फॅशनचा जलवा पहायला मिळाला. भारतातून अभिनेत्री आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि ईशा अंबानी यांनी रेड कार्पेटवर ग्रँड एन्ट्री केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Isha Ambani Met Gala 2023 : मेट गालामध्ये इशा अंबानीचा ग्लॅमरस लूक, आलिया-प्रियांकालाही मागे टाकलं !
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 9:44 AM

Met Gala 2023 : सेलिब्रिटींच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असलेला ‘मेट गाला 2023’ (Met Gala 2023) सुरू झाला आहे. जगभरातील विविध सेलिब्रिटी या फॅशन महोत्सवात हजेरी लावतात. यंदाही हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत, जगभरातील बड्या सेलिब्रिटींनी मेट गाला 2023 च्या रेड कार्पेटवर त्यांच्या सौंदर्याची झलक दाखवली. मेट गालामध्ये सेलिब्रिटींचे रंगीत पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेतात. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) भारतातून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचल्या. मेट गालाच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री आलिया भट्टने डेब्यु केले असून तिच्या जबरदस्त लुक्सने चाहत्यांना वेड लावले. तर ईशा अंबानीच्या किलर लुक्सने बॉलीवूडमधील अनेक सौदर्वतींना मागे टाकले. ईशा अंबानीच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.

मेट गाला 2023 मध्ये, ईशा अंबानीने तिची शानदार फॅशन दाखवली. ईशा अंबानीने काळ्या रंगाचा साडी-गाऊन परिधान केला होता. ईशाच्या स्टनिंग लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. बऱ्याच वर्षांनी ईशा गाला इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. ईशाने डिझायनर प्रबल गुरुंगचा डिझायनर आउटफिट परिधान केला होता. तिचा हा मेट गालाचा चर्चेत असलेला ब्लॅक सॅटिन साडीचा गाऊन मोती आणि स्फटिकांनी सजलेला आहे.

View this post on Instagram

A post shared by VOGUE India (@vogueindia)

या ब्लॅक सॅटिन साडी-गाऊनमध्ये ईशा अंबानीने तिच्या लूकने बॉलीवूड सुंदरांना मागे टाकले. क्रेप आउटफिटमध्ये ईशा अंबानीने फॅशनच्या बाबतीत आलिया प्रियांकालाही मात दिली. या आऊटफिटसोबत तिने ईशाने हातात पोटली पर्स घेतली असून केस कर्ल (कुरळे) करून मोकळे सोडले होते. तिचा हा लूक आणखी परफेक्ट करण्यासाठी ईशाने डायमंड नेकपीस आणि ब्रेसलेटही परिधान केले.

मात्र, ईशा अंबानी मेट गालामध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ईशा अंबानी 2019 मध्ये झालेल्या गाला इव्हेंटमध्येही पोहोचली होती आणि तेव्हाही तिने डिझायनर प्रबल गुरुंगचा ड्रेस परिधान केला होता. ईशाने प्रिन्सेस गाऊन घातला होता आणि तिच्यासोबत खास डायमंड ज्वेलरी घातली होती. ईशाला हिऱ्यांच्या दागिन्यांची खूप आवड आहे, म्हणूनच ती मोठ्या कार्यक्रमांमध्ये फक्त हिऱ्याचे दागिने घालण्यास प्राधान्य देते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.