Janhvi Kapoor : जान्हवीने केलं आईचं स्वप्न पूर्ण ! श्रीदेवी यांच्या घरात तुम्हालाही राहता येईल, पण कसं ?

जान्हवी कपूर आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांचं हे घर थोडे रिनोव्हेट करून त्याचे हॉटेलमध्ये रुपांतर केलं आहे. इथे राहून, लोकं एन्जॉय करू शकतात. जान्हवीने हे घर आता रेंटल कंपनीला दिलं आहे.

Janhvi Kapoor : जान्हवीने केलं आईचं स्वप्न पूर्ण !  श्रीदेवी यांच्या घरात तुम्हालाही राहता येईल, पण कसं ?
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 3:02 PM

2018 साली अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत अकस्मात निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि कुटुंबियांसाठी तर हा मोठा दु:खाचा क्षण होता. जान्हवी, खुशी आणि बोनी एकटे पडले. श्रीदेवीची आठवण आल्यावर ते तिघे अनेकदा चेन्नईत जाऊन तिथल्या घरी वेळ घालवायचे. खरंतर श्रीदेवी यांनी चेन्नईत एक घरं घेतलं होतं. सी-फेसिंग असलेल्या या घराचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यांना ते शक्य झाले नाही. मात्र आता त्यांच्या पश्चात, श्रीदेवीच्या लेकीने आईचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. जान्हवी आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवीची ही इच्छा पूर्ण केली.

आईचं स्वप्न लेकीकडून पूर्ण

जान्हवी आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या घराचे थोडेसे रिनोव्हेशन करून त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. आता सामान्य लोकही इथे येऊन राहू शकतील. जान्हवीने हे घर एका रेंटल कंपनीला दिले आहे, त्यांनी ते ‘आयकॉन’ कॅटेगरीत टाकले आहे. बोनी कपूरसोबत लग्न केल्यानंतर श्रीदेवी यांनी हे घर विकत घेतले होते

रेंटल कंपनीसोबत झालेल्या या टायअप बद्दल जान्हवीने प्रतिक्रिया दिली. आम्ही माझ्या आईचे अनेक वाढदिवस तिथे साजरे केले आहेत. माझा आणि वडिलांचा वाढदिवसही साजरा केला. आई गेल्यानंतर आम्हाला या घरात जास्त वेळ घालवता आला नाही. कारण त्याचे रिनोव्हेशनही बाकी होते. या घराचे थोडं नूतनीकरण करून त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर व्हावे, अशी माझ्या आईची इच्छा होती. आई गेल्यानंतर बाबांनी ते रिनोव्हेशन करून घेतले. मला हे श्रीसाठी ( श्रीदेवी यांच्यासाठी) करायचं आहे, असं ते म्हणायचे, अशी आठवण जान्हवीने सांगितली. रिनोव्हेनशन केलं आणि आम्ही तिथे बाबांचा वाढदिवस साजरा केला. आई गेल्यानंतर बाबांनी पहिल्यांदा तिथे वाढदिवस साजरा केला. 2-3 वर्षांनी मी माझ्या वडिलांना थोडं आनंदी पाहिलं, असं जान्हवी म्हणाली.

श्रीदेवी यांच्या घरात कोण राहू शकतं ?

श्रीदेवी यांच्या या घराचे आता हॉटेलमध्ये रुपांतर झाल्यानंतर सामान्य लोक इथे विनामूल्य राहू शकता. पण त्यासाठी त्यांना अप्लाय करावं लागले. जर ते गोल्डन तिकीट जिंकले, तर काही अटींचं पालन करून त्यांना या घरात विनामूल्य राहता येईल. यावर्षी 4000 तिकीटं उपलब्ध आहेत. जे यातलं तिकीट जिंकलील, ते अतिशय कमी किमतीत या आलिशान घरात राहू शकतात.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘उलझ’ या चित्रपटात दिसणार आहे.

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.