Janhvi Kapoor | ‘फोटोतला तो मुलगा कोण?’, जान्हवी कपूरच्या नव्या फोटोंवर चाहत्यांचा सवाल!

जान्हवीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यास सुरुवात केली आहे. सगळे चाहते तिला या मुलाबद्दल सतत विचारत आहेत.  ‘हा मुलगा कोण आहे?’, असा प्रश्न जान्हवीच्या चाहत्यांना पडला आहे.

Janhvi Kapoor | ‘फोटोतला तो मुलगा कोण?’, जान्हवी कपूरच्या नव्या फोटोंवर चाहत्यांचा सवाल!
जान्हवी कपूर
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:00 PM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाविषयी चर्चेत आहे. जान्हवी कपूरचा ‘रुही’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. हा चित्रपट म्हणजे तिचे धडाकेबाज पुनरागमन असल्याचे तिचे चाहते म्हणत आहेत. या चित्रपटासाठी तिने खूप परिश्रम घेतले होते. त्यानंतर आता ती एका दीर्घ सुट्टीवर गेली आहे. काही काळापूर्वी जान्हवी कपूरने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी सध्या एलएमध्ये (लॉस एंजेलिस) सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. जान्हवीच्या या फोटोंमध्ये एक मुलगाही दिसला आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली आहे (Janhvi Kapoor shares latest vacation trip photos on social media).

जान्हवीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यास सुरुवात केली आहे. सगळे चाहते तिला या मुलाबद्दल सतत विचारत आहेत.  ‘हा मुलगा कोण आहे?’, असा प्रश्न जान्हवीच्या चाहत्यांना पडला आहे. रोहन जौरा असे त्याचे नाव असून, तो जान्हवीच्या फोटोंमध्ये का दिसला, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. व्हेकेशन ट्रीपचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत जान्हवीने लिहिले की, ‘एलएमध्ये येऊन अवघ्या एका मिनिटाचा कालावधी झाला आहे आणि आता ही जागा मला माझ्या घरासारखी वाटू लागली आहे.’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या चित्रांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रात जान्हवी समुद्र किनाऱ्यासमोर उभी आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. या फोटोत जान्हवीने गुलाबी रंगाचा टॉप घातला आहे, ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.

पाहा जान्हवीची पोस्ट

बॉक्स ऑफिसवर जान्हवीच्या चित्रपटाचा धमाका

जान्हवी कपूरच्या ‘रूही’ या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठा धमाका केला आहे. रिलीजच्या अवघ्या 10 दिवसांत या चित्रपटाने 17.43 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. इतकेच नव्हे तर, कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरही चांगली कमाई दिसली आहे (Janhvi Kapoor shares latest vacation trip photos on social media).

अशी आहे चित्रपटाची कथा

या कथेची सुरुवात ‘कॅच मॅरेजिंग’ने होते. भावरा (राजकुमार राव) आणि कट्टानी (वरुण शर्मा) ज्या गावात राहतात, त्या छोट्याशा गावात ही सामान्य प्रथा आहे. दोघेही एका वृत्तपत्रासाठी काम करतात, परंतु त्याच वेळी ते मुलींचे अपहरण करतात आणि त्यांना लग्नासाठी भाग पाडतात. जेव्हा ते रुहीला (जान्हवी कपूर) पकडतात, तेव्हा त्यांचे आयुष्य वेगळेच वळण घेते. रुही ही एक अशी मुलगी आहे, जिच्यात अफजाचा आत्मा आहे आणि त्यानंतर ही कथा आणखी मनोरंजक बनते.

‘रुही’ हा राजकुमार राव याच्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. राजकुमार राव ‘स्त्री’मध्ये देखील मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला.

(Janhvi Kapoor shares latest vacation trip photos on social media)

हेही वाचा :

Disha Patani | सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर करताच ट्रोल झाली दिशा पाटनी, पहा काय म्हणाले नेटकरी…

बॉलिवूडमध्ये ‘स्टारकिड्स’ची भरणा, आता सलमानच्या घरातील ‘या’ व्यक्तीला लाँच करणार सूरज बडजात्या!

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.