‘जस्सी’फेम अभिनेत्री मोना सिंह 38 व्या वर्षी बोहल्यावर?

वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्री मोना सिंह दाक्षिणात्य बॉयफ्रेण्डसह विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

'जस्सी'फेम अभिनेत्री मोना सिंह 38 व्या वर्षी बोहल्यावर?
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 9:41 AM

मुंबई : ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेमुळे नावारुपास आलेली अभिनेत्री मोना सिंह येत्या वर्षअखेरीस बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. वयाच्या 38 व्या वर्षी मोना दाक्षिणात्य बॉयफ्रेण्डसह विवाहबंधनात (Actress Mona Singh Wedding) अडकणार असल्याची चर्चा आहे.

मोना गेल्या वर्षभरापासून रिलेशनशीपमध्ये असून डिसेंबर महिन्यात ती लग्न करणार आहे. ‘पिंकविला’ वेबसाईटने याविषयी बातमी दिली आहे. मोनाने मात्र लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं नसलं, तरी नाकारलंही नाहीये.

‘मिशन ओव्हर मार्स’ या वेब सीरिजमध्ये मोना नुकतीच झळकली होती. याआधी तिने कहने को है हमसफर, ये मेरी फॅमिली सारख्या वेब सीरिजही गेल्या वर्षी केल्या होत्या. राधा की बेटिया कुछ कर दिखायेगी, क्या हुआ तेरा वादा यासारख्या मालिका, थ्री इडियट्स सारख्या चित्रपटातील भूमिकांमुळे ती गाजली. ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाची ती विजेती होती..

दिवाळी साजरी करताना अभिनेत्रीच्या ड्रेसला आग, फोटो…

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतील चष्मीष लूकमुळे मोना उत्सुकतेचा विषय ठरली होती. मालिकेच्या सुरुवातील मोना सिंह प्रत्यक्षात कशी दिसते, याविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यानंतर सुरवंटाचं फुलपाखरु झालं आणि मोनाचा खरा लूक समोर आला. 2003 मध्ये सुरु झालेल्या एकता कपूरच्या या मालिकेने तीन वर्ष तूफान लोकप्रियता मिळवली होती.

मोनाला आता नववधूच्या वेशात पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना (Actress Mona Singh Wedding) लागून राहिली आहे.

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.