तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला नव्हता का?, जया बच्चन यांचा पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर हल्ला

| Updated on: Mar 26, 2025 | 10:26 AM

Jaya Bachchan on Eknath Shinde: जया बच्चन यांचा पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला, पण का? काय आहे प्रकरण? म्हणाल्या, 'तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला नव्हता का?' सर्वत्र जया बच्चन यांच्या वक्तव्याची चर्चा..

तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला नव्हता का?, जया बच्चन यांचा पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर हल्ला
Follow us on

Jaya Bachchan on Eknath Shinde: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंग केल्यांमुळे कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कुणाल केलेल्या व्यंगाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणातील वातावरण देखील तापलं आहे. अनेकांनी एकनाथ शिंदे यांचं समर्थन केलं आहे तर, काहींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याची (फ्रीडम ऑफ स्पीच) आठवण करुन देत कुणाल कामरा याची बाजू घेतली. दरम्यान खासदार-अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करत कुणाल याची बाजू घेतली आहे.

जया बच्चन म्हणाल्या ‘बोलण्यावर असे निर्बंध लादण्यात आले तर, माध्यमांचं काय होईल. माध्यमांवर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. उद्या ते म्हणतील जया बच्चन यांची मुलाखत घ्यायची नाही. अखेर कुठे आहे फ्रीडम ऑफ स्पीच… बोलण्याचं स्वातंत्र्य तेव्हाच असतं, जेव्हा मारामारी होती. विरोधकांना मारलं जातं, महिलींचा बलात्कार केरून त्यांची हत्या केली जाते… विरोधकांनी काहीही बोलू देऊ नका…’

 

 

जया बच्चन येथे थांबल्या नाहीत, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत म्हणाल्या, ‘सत्तेसाठी जो खरा पक्ष होता तो सोडला. स्वतःचा पक्ष तयार केला. तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला नव्हता का? ‘ असं म्हणत जया बच्चन यांनी महाराष्ट्र सरकारवर देखील निशाणा साधला.

सध्या जया बच्चन यांचं वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, जया बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेक विषयांवर परखड मत मांडत जया बच्चन स्वतःचं मत मांडतात. ज्यामुळे जया बच्चन यांना अनेकदा टीकाचा सामना देखील कराला लागतो.

कुणाल याने तयार केलेली कवीता…

“थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा.. हाये एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाए जिस थाली में खाए, उसमे ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी मे मिल जाए तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहें…’