मी माझ्या पतीपासून… अमिताभ बच्चन यांच्यासोबत नातं कसं ? जया बच्चन यांनी केला खुलासा

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा पॉडकास्ट सध्या खूप गाजतोय. 'व्हॉट द हेल नव्या'या शोचा सध्या दुसरा सीझन सुरू असून तो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या पॉडकास्टमध्ये नव्या सह तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चनदेखील सहभागी होतात.

मी माझ्या पतीपासून... अमिताभ बच्चन यांच्यासोबत नातं कसं ? जया बच्चन यांनी केला खुलासा
अमिताभ यांच्यासोबत नातं कसं ?
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 11:20 AM

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा पॉडकास्ट सध्या खूप गाजतोय. ‘व्हॉट द हेल नव्या’या शोचा सध्या दुसरा सीझन सुरू असून तो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या पॉडकास्टमध्ये नव्या सह तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चनदेखील सहभागी होतात. नव्याने तिच्या शोच्या शेवटच्या एपिसोडचा नवा प्रोमो जाहीर केला आहे. त्यामध्येही ती आई आणि आजीसोबत मैत्री वर बोलताना दिसली. याच पॉडकास्टदरम्यान जया बच्चन यांनी त्यांचे अमिताभ बच्चनसोबत नातं कसं आहे हे देखील सांगितलं. नव्याच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी महत्वाचा खुलासा केला.

अमिताभ यांच्याबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन ?

‘ माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्या घरातच आहे ‘ असे प्रोमोच्या सुरूवातीला जया म्हणाल्या. त्यावर नव्या म्हणाली, ‘जर दोन लोक फक्त मित्र असतील आणि त्यांनी त्यांच्या मैत्रीत रोमान्स आणला तर ते बरोबर आहे का?’ तिच्या प्रश्नाला उत्तर देताना जया म्हणाल्या, ‘हे बरोबर आहे. माझा नवरा माझा चांगला मित्र आहे आणि मी त्यांच्यापासून काहीही लपवत नाही. नव्या म्हणाली, ‘आजीचे ( जया बच्चन) मित्र घरी येतात तेव्हा मला खूप मजा येते आणि ते तिच्याशी अशा पद्धतीने बोलत असतात, आपण तसं बोलण्याचा विचारही करू शकत नाही. ते पाहून मला खूप मजा येते, कारण ते आजीला त्रास देतात असंही नव्या म्हणाली.

मैत्रीबद्दल श्वेता बच्चन म्हणाली..

‘आमची मुलं आमची बेस्ट फ्रेंड आहेत असं लोकं का म्हणतात ते मला कळत नाही? असं मत श्वेताने मांडलं. ‘पण तुम्ही मुलांचे मित्र तुझी मैत्री का होऊ शकत नाहीत?’ असा सवाल जया यांनी श्वेताला विचारला. ‘आपम मित्र नाहीयोत. तू माझी आई आहेस. आपल्यात एक सीमा आहे जी मी कधीही ओलांडणार नाही, असं श्वेता म्हणावी. ‘माझी मुलं ही माझी मुलं आहेत आणि माझे मित्र हे मित्र’ असे सांगत दोन्ही नाती वेगळी असल्याचं श्वेताने नमूद केलं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.