श्रद्धा कपूर आणि सुशांतसाठी ‘सीबीडी ऑईल’ मागवायचे; जया साहाची NCB कडे कबुली

‘मी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंह राजपूतसाठी ‘सीबीडी ऑईल’ हे ड्रग मागवायचे’ अशी धक्कादायक कबुली सुशांतची माजी टॅलेंट मॅनजर जया साहाने दिली आहे

श्रद्धा कपूर आणि सुशांतसाठी ‘सीबीडी ऑईल’ मागवायचे; जया साहाची NCB कडे कबुली
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 3:54 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येशी निगडीत ड्रग्ज प्रकरणी एनसीबीची धडक कारवाई सुरु आहे. एनसीबीकडून सुशांतची माजी टॅलेंट मॅनजर जया साहाची सलग दोन दिवस (21-22 सप्टेंबर) चौकशी करण्यात आली. दोन दिवसाच्या या चौकशी दरम्यान जया साहाने अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. याच चौकशीत ‘मी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंह राजपूतसाठी ‘सीबीडी ऑईल’ मागवायचे’ अशी धक्कादायक कबुली तिने दिली आहे. ‘सीबीडी ऑईल’ भारतात बंदी असलेले ड्रग आहे. (Jaya Saha confesses ordering CBD Oil drug for Shraddha Kapoor and Sushant Singh Rajput)

एनसीबीने जयाचे चॅट तपासून तिची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जयाने आपण अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ‘सीबीडी ऑईल’ची तजवीज केली असल्याचे सांगितले. श्रद्धासाठी जयाने ‘सीबीडी ऑईल’ ऑनलाईन मागवले होते. या व्यतिरिक्त रिया, सुशांत, चित्रपट निर्माता मधु मांटेना आणि स्वतःसाठीदेखील जया ‘सीबीडी ऑईल’ मागवायची. आतापर्यंत कोणत्याही ड्रग तस्कराशी आपण संपर्क केला नसल्याचे तिने म्हटले आहे.

जया साहाच्या चौकशी दरम्यान समोर आलेल्या गोष्टी

• जया साहाच्या चौकशी दरम्यान क्वान आणि सुशांत सिंह राजपूत संबंधित माहिती समोर आली. • जया साहाने क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीमधील आपल्या कामासंबंधी माहिती दिली. • सुशांत सिंह राजपूतसाठी क्वान कंपनीने काम केले होते. • जया साहा या क्वान कंपनीच्या भागीदारांपैकी एक आहे. • जयाच्या म्हणण्यानुसार क्वान कंपनीचे 10 भागीदार आहेत. • जया साहाने 2016 पासून सुशांतसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. • ‘ड्राईव्ह’, ‘सोनचिरीया’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ या चित्रपटांसाठी जयाने सुशांतला साईन केले होते. • ‘ड्राईव्ह’साठी सुशांतला 2.25 कोटी रुपये देण्यात आले होते. ‘सोनचिरीया’साठी 5 कोटी, ‘केदारनाथ’साठी 6 कोटी, ‘छिछोरे’साठी 5 कोटी, तर ‘दिल बेचारा’साठी 3.5 कोटी देण्यात आले होते. • चित्रपटांव्यतिरिक्त जया साहाने सुशांतला 2016 ते 2019 दरम्यान अनेक कार्यक्रमांसाठीदेखील साईन केले होते.

“तेव्हा सुशांतने 12 कोटी मागितले”

जया साहाने आपल्या वक्तव्यांबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले की, कुमार मंगल यांच्या आगामी चित्रपटासाठी 5 जून रोजी आपली सुशांतशी शेवटची बातचीत झाली होती. सुशांतला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली होती, असेदेखील तिने नमूद केले. या चित्रपटासाठी सुशांतला 6 कोटींमध्ये साईन करायचे होते, परंतु सुशांत त्यात खुश नव्हता. त्याने चित्रपटासाठी दुप्पट म्हणजे 12 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा दावा जयाने केला. सुशांत भेटीदरम्यान अतिशय वेगळ्या प्रकारे, विक्षिप्तपणे वागायचा, मधेच उठून चालायचा, बेडरुममध्ये जायचा, असेही तिने आपल्या जबाबात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

रियामागची शुक्लकाष्ट संपेना, पावसामुळे जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स

(Jaya Saha confesses ordering CBD Oil drug for Shraddha Kapoor and Sushant Singh Rajput)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.