Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jhund : नागराज मंजुळेंचा ‘झूंड’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? पहिल्या दिवशीची कमाई उघड, कौतूक होतंय तर मग प्रेक्षक का नाहीत?

पण आता मात्र प्रेक्षक बाजीप्रभूंची गाथा पहातायत. हिंदीतला बिग बजेट संजय लीला भन्साळीचा गंगुबाई काठियावाडी अजून बॉक्स ऑफिसरवर फुल्ल कमाई करतोय. तोही 70 कोटीच्या वर पोहोचलाय.

Jhund : नागराज मंजुळेंचा 'झूंड' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? पहिल्या दिवशीची कमाई उघड, कौतूक होतंय तर मग प्रेक्षक का नाहीत?
बॉक्स ऑफिसरवर जादू चालवण्यात पहिल्या दिवशी झूंड कमी पडलाय.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:31 PM

नागराज मंजुळेंच्या झूंडची (Jhund) सगळीकडे चर्चा आहे. अर्थातच त्याला वेगवेगळी कारणं आहेत. एक तर सैराटनंतर नागराज कडून वाढलेल्या अपेक्षा, बिग बीचं (Big B) सिनेमात असणं, आमिर खाननं केलेली स्तुती, कोरोनानंतर रिलिज होणारी बडे परदे पर बडी फिल्म असं झालेलं प्रमोशन. अनेक कारणं आहेत. पण झूंडची जेवढी चर्चा होतेय आणि जेवढं कौतूक होतंय त्या तुलनेत प्रेक्षक मात्र सिनेमाला मिळताना दिसत नाहीयत. कारण शुक्रवारी मोठ्या धुमधडाक्यात रिलिज झालेला झूंड बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालाय की काय अशी चर्चा सुरु झालीय. कारण पहिल्या दिवशी जेवढी कमाई अपेक्षीत होती ती झालेली नाही. शुक्रवारचे आकडे समोर आलेत आणि कमाईचे हे आकडे फक्त नागराजच (Nagraj Manjule) नाही तर त्याचं जे एक स्वतंत्र फॅन फॉलोईंग तयार झालंय त्यांचीही निराशा करणारं आहे.

नेमकी किती कमाई झाली? झूंड फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर रिलिज झालाय. सिनेमाचा पहिला दिवस हा महत्वाचा असतो. बॉक्स ऑफिसवर तो काय कमाल करतो याकडे सर्वांचच लक्ष असतं. झूंडची शुक्रवारी कमाई मात्र नगण्य राहीलीय. फिल्म परिक्षक तरण आदर्शनं कमाईचे आकडे ट्विट केलेत. आणि त्यात झूंडनं पहिल्या दिवशी फक्त दीड कोटीचा गल्ला जमवल्याचं म्हटलंय. दीड कोटीचा गल्ला, तोही त्या सिनेमाचा ज्यात अमिताभ बच्चन नायक आहे, नागराज मंजुळे, टी सिरीजसारखी अशी तगडी नावं आहेत, त्याप्रमाणात एकदम थंड मानला जातोय. पण झूंडला माऊथ पब्लिसिटीचा फायदा मिळण्याची चिन्हं वर्तवली जातायत. कारण झूंड बघून बाहेर पडलेला प्रेक्षक नागराजच्या झूंडच्या प्रेमात आहे. जो जिथं जातोय तिथं त्याची स्तुती करतोय. सोशल मीडियावरही तो व्यक्त होतोय. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी झूंडच्या गल्ल्यात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. निर्मात्यांनाही तशीच अपेक्षा असावी. पण आपल्याकडे शुक्रवारी सिनेमा रिलिज होतो, त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस कुठल्याही सिनेमाच्या कमाईच्या दृष्टीनं महत्वाची आहेत.

झूंडला टक्कर कुणाची? झूंडला टक्कर कुणाची हा खरा प्रश्न आहे. थिएटरमध्ये असलेला मराठी सिनेमा पावनखिंड हा अजूनही हाऊसफुल्ल आहे. त्यालाही माऊथ पब्लिसिटीचा फायदा मिळालेला आहे. पहिले काही दिवस तोही म्हणावा तेवढी कमाई करत नव्हता. पण आता मात्र प्रेक्षक बाजीप्रभूंची गाथा पहातायत. हिंदीतला बिग बजेट संजय लीला भन्साळीचा गंगुबाई काठियावाडी अजून बॉक्स ऑफिसरवर फुल्ल कमाई करतोय. तोही 70 कोटीच्या वर पोहोचलाय. अजूनही तो बॉक्स ऑफिसवर जोरदार चालतोय. त्यामुळे बच्चनच्या झूंडला आलिया भारी पडणार की काय अशी स्थिती आहे. हॉलीवुडचा बॅटमनही तरुणांना खेचणार असं दिसतंय. मंजुळेंचे आधीचे सिनेमे हे तरुणांनीच डोक्यावर घेतलेले होते. त्या तुलनेत झूंडचं काय होणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा:

अमिताभ बच्चन यांनी ‘झूंड’चं एक दिवसही प्रमोशन का केलं नाही? चर्चांना उधाण, चांगला पिक्चर रखडतोय?

“इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, ‘झुंड’वर टीकेचे बाण

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.