महागड्या बाईक्सची आवड पडली महागात, वेगाच्या नादात जॉन अब्राहमने दोघांना उडवलं, वाचा पुढे काय घडलं…

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham ) याला महागड्या सुपर बाईक फार आवडतात. जॉनने आपल्या याच आवडीमुळे सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती.

महागड्या बाईक्सची आवड पडली महागात, वेगाच्या नादात जॉन अब्राहमने दोघांना उडवलं, वाचा पुढे काय घडलं...
जॉन अब्राहम
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 8:16 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham ) याला महागड्या सुपर बाईक फार आवडतात. जॉनने आपल्या याच आवडीमुळे सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. आजही जॉन आपल्या सुपर बाईकवरुन बर्‍याचदा मुंबईत फिरताना दिसतो. मात्र, याच बाईकच्या वेडापायी अभिनेत्याविरोधात एकदा अपघाताची नोंद देखील करण्यात आली होती. 2006 मध्ये जॉन अब्राहमवर बेशिस्तपाने आणि वेगाने गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता (John Abraham sports bike accident in 2006).

2006 मध्ये जॉन अब्राहमच्या गाडीने अतिशय वेगाने दोन जणांना धडक दिली होती. या अपघातात रस्त्यावर चालणारे लोकही किंचित जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम 279 (सार्वजनिकपणे वाहन चालवणे किंवा वेगवान वाहन चालविणे) आणि 337 (इतरांच्या जीवाला धोका पोहचवणारी किंवा इतरांच्या वैयक्तिक सुरक्षेला इजा पोहचवणारी कारवाई) या कलमांतर्गत तक्रार दाखल केली.

जखमींची कोणतीही तक्रार नाही!

या खटल्याच्या सुनावणी दरम्यान जॉनने कोर्टाला सांगितले की, ज्या लोकांना दुखापत झाली आहे त्यांनी या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तो एक छोटासा अपघात होता. मात्र, 2010 मध्ये ट्रायल कोर्टाने जॉनला 15 दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटकदेखील केली होती.

पण, जॉनने हार मानली नाही आणि अभिनेत्याने या संपूर्ण प्रकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या प्रकरणी जामिनासाठी मागणी केली. जॉनला येथे दिलासा मिळाला होता. याप्रकरणी हायकोर्टाचे न्यायाधीश आर.सी.चव्हाण यांनी जॉनच्या सुटकेचे आदेश दिले. यासह, त्याला 20,000 रुपये जामीन देण्याचे आदेश देण्यात आले होते (John Abraham sports bike accident in 2006).

हा केवळ छोटासा अपघात

आपल्या या निर्णयामध्ये कोर्टाने म्हटले आहे की, पीडितांना केवळ साध्या जखमा झाल्या आहेत आणि आरोपी संपूर्ण जामिनावर बाहेर राहिला आहे, याची जाणीव ठेवून त्याला जामिनावर सोडले जाऊ शकते. या संपूर्ण अपघातानंतर जॉन अब्राहम स्वत: या पीडितांना दवाखान्यात घेऊन गेला होता आणि त्यांच्यावर औषध उपचार केले होते. हे प्रकरण 2006मध्ये घडले होते. परंतु, या प्रकरणात 2012 मध्ये निर्णय घेण्यात आला होता.

‘पठाण’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

जॉन अब्राहम आजकाल बॉलिवूडचा एक मोठा स्टार म्हणून नावारूपाला आला आहे. सध्याच्या घडीला त्याची जोरदार फॅन फॉलोइंग देखील आहे. जॉनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, तो लवकरच त्याच्या ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. यासह जोन अब्राहम, शाहरुख खानसमवेत त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॉन सोबत दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. कारण, कोरोनामुळे भारतभर आऊटडोअर शूटिंग संपूर्ण बंद करण्यात आले आहे.

(John Abraham sports bike accident in 2006)

हेही वाचा :

आर्यनला घरातही ‘शर्टलेस’ फिरण्यावर बंदी! शाहरुख खानने सांगितले कारण…

Radhe | भारतातील केवळ 3 थिएटरमध्ये प्रदर्शित होणार ‘राधे’, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहू शकता सलमानचा ‘अॅक्शन पॅक’?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.